नवीन लेखन...

मुंबैतील देवांच्या जन्माची चित्तरकथा

माणसाला देवाने जन्म दिलाय की नाही माहित नाही, पण देवाला मात्र माणसानेच जन्म दिलाय, हे पुरातन सत्य या वाचन-लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने अनुभवायला मिळालं. यात कोणताही धर्म अपवाद नाही. देवांच्या या जन्माची आणि त्यांच्या बारशाची आणि त्यांच्या उत्सवी वाढदिवसांच्या चित्तरकथा मी सध्या लिहितोय. […]

एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग १

“लक्ष्मी“ असं तिचं नांव होतं. लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी. कौतुकाने त्या नावाचं रूपांतर ‘लक्की’ – इंग्लिशमध्ये “सुदैवी’’ किंवा “नशीबवान” असं झालं. हे नांव सोपं, सुटसुटीत आणि लक्षांत रहाण्यासारखं होतं. तिच्या वडलांना – श्री.रंगनाथ पै यांना ते समर्पक वाटलं होतं. तिच्या आधी जन्मलेली चार मुलं बाल्यावस्थेत मरण पावली होती. सहाजिकच तिच्या आईवडलांना तिच्यावर जास्त माया होती शिवाय तिच्या जन्मानंतर रंगनाथ पै यांच्या हाटेलच्या धंद्यात भरभराट झाली आणि ते अधिक श्रीमंत झाले. […]

मला भेटलेला स्पायडरमॅन

स्पायडरमॅन पिक्चर पाहिल्यानंतर आपल्या अंगी अचाट करामती करता येण्यासारखी स्पायडरमॅन, ही मॅन, शक्तीमॅन किंवा हनुमॅन यांच्याप्रमाणे कुठलीही शक्ती नाही या विचाराने थोडा न्युनगंड आला होता. पण जवळ काहीही आॅप्शन नसल्याने तो ही थोडया दिवसांनी गेला आणि मी पुन्हा नॉर्मल झालो. […]

पापी !

भारताच्या निकोबार बेटा पासून पूर्वेस दूर हे काळू बेट आहे. हे इतके लहान आणि नगण्य आहे कि जगाच्या भुगोलांच्या पुस्तकांनी आणि नकाशांनी याची दाखल सुद्धा घेतलेली नव्हती ! सॅटेलाईटच्या उजेडात हे जगाच्या नकाशावर आत्ताअवतरले आहे ! भारतीय आणि चीनी लोक मात्र ‘अक्षय तारुण्य ‘ देणाऱ्या वनस्पतीच्या शोधात येथे यायचे ! […]

डोके ज्याचे त्याचे

झिरो कट ! आता पुन्हा या फॅशनची चालती आहे ! कानाच्या वर चार बोटाच्या पट्ट्यातले केस या कानापासून व्हाया मानगूट ते त्या कानापर्यंत झिरो मशीनने काढून टाकतात. ट्रॅकटरने शेत नागरल्यासारखं दिसत ! त्यात एक ठळक पाय वाट पण बरेचदा केली जाते ! टाळू वर केसांचं ‘ओयासिस’ तसेच ! या ‘ओयासिसचे पुन्हा व्हेरिएशन्स आहेतच, मागे, पुढे नायतर उभे शिंगा सारखे ! […]

हार-जीत बनुनी बघ

मित्रांनो, “हार-जीत बनुनी बघ ” ही मराठी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका. “माझी डायरी ” या आपल्या चॅनलला अवश्य Subscribe करा. “माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे. subscribe me : https://www.youtube.com/channel/UCWg4s4JepryoGlUdgiAFttQ

प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर

प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म २४ जुन १८९७ रोजी गुजराथ मधील भंडारण जिल्ह्यातील जहाज या गावी झाला. पंडित ओंकारनाथ ठाकुर हे ग्वाल्हेर घराण्याचे एक प्रसिद्ध गायक होते. ओंकारनाथजी चौथे व शेवटचे अपत्य. ओंकारनाथजींचे बाल आयुष्य अतिशय कष्ट, गरिबी व हालअपेष्टांनी भरलेलं होते. ओंकारनाथ ठाकूर यांचे आजोबा पं. महाशंकर ठाकुर व वडिल पं. गौरीशंकर हे […]

मराठी माध्यमातून शिक्षणाकडे पालकांचा वाढता कल : एक सुचिन्ह

आपण मराठी म्हणून ओळखले जाण्यात आपल्या भाषेचा मोठा भाग असतो. आपलं समाजातील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपली भाषा टिकवणं क्रमप्राप्त होतं आणि हे टिकवण शालेय शिक्षणातूनच जास्त शक्य होतं. म्हणून आपल्या मुलांचं किमान प्राथमिक शिक्षण आपल्या मातृभाषेतून होणं आपल्यासाठी आणि त्या मुलांसाठीही महत्वाचं असतं. […]

वाहतो ही दुर्वांची जुडी – अजरामर मराठी नाटक

लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे एक लोकप्रिय व गाजलेले नाटक. बाळ कोल्हटकर म्हणजे महाराष्ट्राचे छोटे गडकरी म्हणून रसिकांनी गौरविलेले व्यक्तिमत्व. १९ जून १९६४ साली भावे नाटयगृह, सांगली येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला, ते आजतागायत नाटक रसिकांच्या पसंतीस उतरलेले आहे. अभिनेत्री आशा काळे, गणेश सोळंकी व सुभाष हे पात्र अजरामर केलेले बाळ कोल्हटकर यांनी त्या काळात […]

1 101 102 103 104 105 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..