सुप्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता हेमंत कुमार
हेमन्ता कुमार मुखोपाध्याय उर्फ हेमंत कुमार यांना संगीताचे औपचारिक शिक्षण मिळाले नव्हते. त्यांचा कुटुंबीयांचा संगीतक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. त्यांचा जन्म १६ जून १९२० रोजी झाला. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकताना १९३५ साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले. गायनात गती असणाऱ्या हेमंत कुमार यांना साहित्यक्षेत्रात देखिल रस होता. १९३७ साली त्यांनी […]