नवीन लेखन...

प्रेम नाणे

तसेंच वागा इतरजणांशी,  वाटत असते ,तुमच्या मनीं अपेक्षा करता तुम्हीं प्रेमाची,  सदैव इतरांकडूनी…१, सहानूभुतीचा शब्द लागतो,  दैनंदिनीच्या तुमच्या जीवनीं क्षणा क्षणाला भासत असते,  जीवन तुमचे अवलंबूनी…२, प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला…३, याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे दोन मनें ती सांधली जावूनी,  आनंद सर्वत्र […]

सदैव जागृत रहा

झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही, विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी …१ विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२ चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा, शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३ एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती…४ चित्त करूनी […]

रचली जाते कविता

मिळता मजला बाह्य एकांत,  छळते गर्दी विचारांची मन गुंतविण्या कुणी नसता,  चलबिचल होते भावनांची…१, शब्द वर्णांचा घेवून आधार,  भावना काढी मार्ग आपला आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला…२, शब्दांना नटवी थटवी,  ध्वनी लहरी नि सूर गेयता अलंकार मिळता अंगी,  रचली जाते एक कविता…३ डॉ. भगवान नागापूरकर ९००५०७९८५० bknagapurkar@gmail.com    

अजाणतेतील अपमान

स्फुर्ति येऊन कविता केली   आनंद झाला मनीं   । चटकन कागदावरी लिहीली   शब्द येतां ध्यानी   ।। कवितेतील शब्दरचना   झाली बहरदार   । कौतूकाची येई भावना   बघुनी शब्द भांडार   ।। पुर्ण करुनी कविता    टिपूनी घेतली वहीत   । काव्य रचना परत वाचतां   मग्न झालो आनंदात   ।। फेकूनी दिला कागद    ज्यावरी रचिली  कविता   । विचारांत होतो धुंद    कृत्य केले मी अजाणतां   […]

दत्ता नाईक उर्फ एन. दत्ता

दत्ता नाईक उर्फ एन. दत्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९२७ रोजी झाला. एन. दत्तांचं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते. लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत […]

मुरब्बी

लोणच्याला चव येते,  थोडे मुरल्यानंतर आंबाही स्वादिष्ट लागे,  आंबून गेल्यानंतर….१, विचारांची मजा वाटे,  ऐकता ज्ञानी विचार पक्वपणा त्याच्यातील,  देई आनंदाला धार…२, पक्वपणा येण्यासाठीं,  अनुभवाची भट्टी हवी ज्ञान तेव्हां चमकते,  जेव्हां तर्कज्ञान पाही….३, विचारांत मुरलेला,  मुरब्बी तो असतो अनुभवाच्या शक्तीनें,  योग्य पावूल टाकतो…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com  

जीवन एक “जाते”

जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा  । दोन चाकांत येईल,  मोडेल त्याचा कणा  ।।१।। जीवन मृत्यूची चाके,  सतत फिरत राही  । येई जो मध्ये त्याच्या,  मागे न उरेल काही  ।।२।। मध्यभागी राही स्थिर,  आंस त्यास म्हणती  । वरचे चाक फिरे,  त्याच्या भोवती  ।।३।। आंसाजवळील दाणा,  दूर तो चाकापासूनी  । परिणाम चाकाचा तो होईल,  मग कोठूनी  ।।४।। जन्म […]

जगदंब रक्षण कर

विश्वास माझा तव चरणी, भाव अपिर्तो तुझ्यावरी, जगदंबे अवती-भवती, राहून माझे रक्षण करी … ।। ध्रु ।। सावध नसे निद्रेच्या काळी, धीर देते राहूनी जवळी, झोपेमध्ये जगा विसरता,  सर्ववेळी तू जाग्रण करी…।।१।। जगदंबे अवती –भवती,  राहून माझे रक्षण करी, धावपळीत चाले जीवन,  संकट भोवऱ्यात फिरून दुर्घटनेची चाहूल देवून,  मनास आमच्या दक्ष करी…२ जगदंबे अवती -भवती राहून […]

श्रेष्ठत्वात न्युनता विसरते

विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच लक्ष्य खेचले जातां विचार नसतो […]

अंगठ्याचा ठसा

गावाकडील एक प्रसंग. बँकेमध्ये  पेसे काढण्यासाठी गेलो होतो. खुर्चीवर बसून पैसे काढण्याचा   फॉर्म भरू लागलो. एक खेडूत बाई, नौवारी लुगडे व कपाळावर मोठे कुंकू, माझ्या जवळ येवून विनऊ लागली. “माझा फॉर्म भरून देता का?” “किती रुपये काढायचे आहेत?” मी विचारले. “पंचवीस हजार रुपये काढायचे आहेत.”  मी थोडेसे आश्चर्याने तिच्याकडे बघितले.   त्या बाईंचा पेहेराव, अशिक्षितपणाची  झलक आणि बोलण्यातील गावान्ढालपण ह्याची माझ्यामनावर त्या बाई  विषयी प्रथमदर्शनी जी प्रतिमा निर्माण  झाली होती, त्याला केवळ त्या आकड्याने धक्का बसला. […]

1 9 10 11 12 13 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..