आधुनिक काळातील हृदय-शस्त्रक्रियांचे जनक – डॉ लुडविग र्हेन
डॉ ऱ्हेन आधुनिक काळातील हृद्य-शस्त्रक्रियांचे जनक मानले जातात. १८९६मध्ये एका २२ वर्षीय रुग्णावर यशस्वी हृद्य-शस्त्रक्रिया करून डॉ ऱ्हेन यांनी हृद्यावरील शल्यचिकित्सेद्वारे करावयाच्या उपचार पद्धतीला खूपच वरच्या पायरीवर नेवून ठेवले. ‘हृदय हे शल्यचिकित्सेच्या परिघाबाहेर आहे’ असे त्या काळात मानले जात होते. परंतु ऱ्हेन यांनी तो परीघ विस्तारला व हृद्य-शल्यचिकित्सा शक्यतेच्या मर्यादेत आणून ठेवली. […]