नवीन लेखन...

धोकादायक देशांतील भारतीयांची सुरक्षा : काही उपाययोजना

अमेरिकेप्रमाणे आपण भारतातून परदेशात जाणार्‍या पर्यटकांनाही अशा धोकादायक देशांविषयी, तेथील परिस्थितीविषयी माहिती देणे, इशारा देणे गरजेचे आहे. अशांत देशांतील भारतीयांची सुरक्षा,धोकादायक परिस्थितीमध्ये बाहेर काढण्यासाठी इव्हॅक्युएशन प्लॅन आणी भारताची ‘होस्टेज रेस्क्यु पॉलिसी लवकरात लवकर तयार करुन त्याची वेळोवेळी रिहर्सल करणे व जरुरी पडल्यास त्यावर अंमल बजावणी करणे जरुरी आहे. […]

प्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे

आषाढच्या मेघाने खाली वाकून जमिनीवर बघितले धुळीच्या आवरणा खाली दिसत होत्या गगनचुंबी ईमारती. आकाशात तेजाबी धूर ओकणाऱ्या असंख्य फैक्ट्ररीज व लाखोंच्या संख्येने रस्त्यावर धावणारी वाहने विषाक्त धूर सोडणारी. एक काळी रेखा हि त्याला दिसली, बहुतेक हीच यमुना असावी. मेघाला यक्षाने भरतखंडाच्या राजधानीचे केलेले वर्णन आठवले. मेघाला प्रश्न पडला इथे खालचे काहीच व्यवस्थित दिसत नाही. अश्या परिस्थितीत यक्षप्रियाला शोधणार तरी कसे? आषाढच्या मेघाने जोरदार वर्षाव करून वातावरण स्वच्छ करण्याचा निश्चय केला. […]

गोष्ट एका ‘ Post ‘ ची

साली एक साधी पोस्ट सुचू नये ? गणूला आजवर असा कधी प्रश्न पडला नव्हता . आता तुम्हाला ‘हा कोण बुवा , गणू ?’ असा प्रश्न पडला असेल . जर तुमचे फेसबुक असेल तर प्रश्नच नाही . तुम्ही त्याला ओळखत असणारच .! कारण त्याचा फे बु मित्रांची संख्या पावसाळ्यात तुंबलेल्या गटारा प्रमाणे ओसंडून वाहत आहे .! म्हणून ‘गणूच्या गप्पा ‘ नावाचे पेज सुरु केले . तेही लोकल लोकनेत्याच्या ढेरी प्रमाणे दिवसेंदिवस फुगतच आहे . शिवाय तो दहा बारा ग्रुपचा तो ऍडमिन आहे ! यात तुम्ही कोठे तरी असणारच कि ! […]

‘पिंपळ्या’ ! एक लघुकथा

‘जिंदगीमे क्या खाना तो -दम -खाना , और क्या करना तो -आराम -करना ‘ हे नागूचे लाडके तत्व . कामाचा प्रचंड कंटाळा . खाऊन झोपणे . झोपेतून उठून पुन्हा खाणे . याच साठी तो जन्माला होता ! तो म्हणजे साक्षात आळस ! पण यालाही एक कारण होते . […]

‘ती’ तिच्या सोबतच !

मला खूप लहानपणा पासून चष्मा लागलाय ,म्हणजे लावायला लागला . याला माझे क्रिकेटचे वेड कारणीभूत होते . असेन दहा बारावर्षाचा ,फॉरवर्ड शॉर्ट लेग माझी फिल्डिंग पोझिशन , नेहमीचीच . तेव्हा आजच्या सारखी हेल्मेट्स नव्हती . […]

‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : भाग – १०

‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर…. […]

मंगळ – एक लघुकथा

नाना हे गावातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व. नानांच्या नावातच दोनदा ‘ना’ असल्यामुळे त्यानी कधी कोणाला नंतर ना म्हटलेच नाही. नानांच वय साधारण 60 वर्षे पण नाना आजही 10 वर्ष वयाच्या बालकांपासुन तर मरणासक्त झालेल्या म्हाताऱ्यां पर्यंत उत्तम पध्दतीने जुळवून घेतात ते नानांच मोठ कौशल्यच म्हणाव लागेल. […]

तुमचा पक्ष कोणता?

निवडणूकांना आता फक्त वर्ष राहीलंय. मतदारांना फितवण्याचे आणि भडकवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. तरी डोकं शांत ठेवा. तुमच्या जीवावर पोळी भाजायचा सर्वांचा कावा लक्षात घेऊन, या निवडणूकीत तुमचा पक्ष कोणता असं कुणी विचारलं, तर ‘देश आणि देशहित’ हाच आमचा पक्ष असं ठणकावून सांगायला कचरू नका.. […]

लग्न; समस्या की समोसा?

‘मनगट आणि बुद्धीच्या जोरावर जगातल्या सर्व समस्यांवर मार्ग काढता येतो’, या अर्थाचं एक विवेकानंदांचं वाक्य आहे. मी काही ते वाचलेलं नाही. विवेकानंदांचं नसलं, तरी जागतल्या बऱ्याच विचारवंत, तत्ववेत्त्यांनी अशाच अर्थाचं काही न काही, कधी ना कधी सांगीतलेलं आहे. […]

1 113 114 115 116 117 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..