डिनर – एक लघुकथा
गाडी चालवता चालवता त्याने डॅश बॉर्डरवरल्या घड्याळावर नजर टाकली . रात्रीचे अकरा वाजून काही मिनिटे झाली होती . डोक्यात नुकत्याच झालेल्या पार्टीची धुंदी होती . पण तो परफेक्ट कंट्रोल मध्ये होता . रस्ता तसा निर्मनुष्यच होता . रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दिव्यांची निमुळती होतजाणारी रांग आणि त्यातला तो रस्ता एखाद्या स्वप्नातल्या दृष्या सारखा मोहक दिसत होता . […]