नवीन लेखन...

मराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं ?

हा लेख स्वत:च्या व इतरांच्या जातीकडे त्रयस्थ नजरेतून पाहाणाऱ्यांसाठी आहे. इतरांनी वाचून स्वत:ला त्रास करुन घेऊ नये आणि जातीविरहित समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या माझ्यासहीत इतरांनाही त्रास देऊ नये ही विनंती. […]

७० रुपयांचं पुस्तक आणि मी..

स्वस्त्यात पुस्तक ही काय मला सुवर्णसंधी वाटत नाही आणि उगाच माफक किॅमतीत पुस्तक मिळतंय म्हणून पुस्तकं घेणं आणि शोपीस म्हणून घरात ठेवणं हे ही मला पटत नाही. तरीही मी अशा पुस्तक प्रदर्शनात जात असतो. न जाणो एखादं उत्तम जुनं पुस्तक सापडूनही जाईल म्हणून. […]

लोकसंगीताचा अर्क – मांड

डिसेंबर मधील राजस्थानातील गारठवणारी रात्र. अवकाशात फक्त चांदण्यांचा प्रकाश, दूर कुठेतरी, कुणीतरी शेकोटी पेटवलेली दिसते परंतु आसमंत सगळाच काळा/निळा. कुठेच कसल्याच हालचालीची जाणीव नाही की आवाज देखील नाही. वाऱ्याने देखील आपले अस्तित्व लपवून ठेवलेले!! एखाद्या निर्वात पोकळीत फक्त स्वत:चेच अस्तित्व असावे, तरीही आजूबाजूला पसरलेल्या मूक वाळूची तितकीच मूक साथ. अशा वेळी वाळवंट देखील आपल्याशी संवाद साधू […]

मातब्बर मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी

मातब्बर मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापूर येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना मा.दत्ता धर्माधिकारी कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक वामनबुवा पाध्ये यांच्याकडे शास्त्रोक्त गाणे शिकायला जात. ‘प्रभात फिल्म कंपनी’त त्यांना नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यांना ‘टाईमकीपर’ची ‘हजेरी मास्तर’ नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यावेळी कुठल्याही कर्मचार्याचला चित्रपटात एखादी किरकोळ भूमिका करावयास सांगत. काही मंडळी अगदी हौसेनं […]

मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी

मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापुर येथे झाला. शांतारामबापूं नंतर हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळवणारा दिग्दर्शक म्हणून दत्ता धर्माधिकारी याचं नाव घ्यावं लागेल. दत्ताजींचं शिक्षण कोल्हापुरातच झालं. त्याच वेळी “पाध्येबुवा‘कडं त्यांनी शास्त्रोक्त गायनाच्या शिक्षणाचे धडेही गिरवले; पण त्यांचे वडील जगन्नाथराव वारल्यामुळं शिक्षण अर्धवट सोडून ते पुण्यात आले आणि नोकरी करायची म्हणून प्रभात […]

मानव जातीचा कर्दनकाळ – एक क्षुद्र मच्छर

पृथ्वीतलावरील उडणाऱ्या कीटकात सर्वात जास्त वेळ उडू शकणार्‍या कीटक आहे डास. त्याच्या अंदाजे २७०० जाती व पोटजाती आहेत.माणसांमध्ये मुख्यतः मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग आफ्रिकन पीत ज्वर, चिकन गुनिया व मेंदूचा दाह हे रोग होण्यास ते कारणीभूत असतात. […]

बंड्या आणि शिक्षणमंत्री

“शाळेचा शोध कुणी लावला?” हा प्रश्न माझ्या सहावीत जाणार्‍या बंड्याला सिनीयर केजीत गेल्यापासून भेडसावतो आहे. खेळणी, कार्टुन आणि छोट्या भीमच्या जगात सुखी असता असता इवल्याशा लहान जीवाच्या मागे हा शाळा नावाचा प्रकार कशासाठी असतो हा त्याचा रास्त प्रश्न आहे. […]

भयानक स्वप्न !

रात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. मधेच जाग कशाने आली? लक्षात येत नव्हते. कसलीतरी खाडखूड ऐकू आली. बहुदा अशाच आवाजाने झोपमोड झाली असावी. पुन्हा तोच खड्खुडीचा आवाज. […]

‘शक्ती’ हेच ईश्वरी रुप

तप्त सळई स्पर्ष करीतां ,   चटका देई शरीराला  । सुप्त अशी औष्णिक शक्ति,   आस्तित्व दाखवी त्या वेळेला  ।। वीजा चमकूनी गर्जती मेघ,   लख्ख उजेड सारते काळोख  । प्रकाश नि ध्वनीच्या लहरी,   आस्तित्वाची दाखवी झलक  ।। साधी असे तार तांब्याची,   झटका देई विद्युत असतां  । विद्युत शक्तीचा परिणाम,  जाणवी देहा प्रवेश करतां  ।। झाडावरले पडता फळ,  भूमी […]

दयार्द्र पिलू

“भरुनी राहिलीस तूच माझिया नेत्रांमधुनी        निद्रेमधुनि, स्वप्नामधुनी, जागृतीतुनी कळले आता असून डोळे नव्हती दृष्टी नव्हते दर्शन इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन” कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या एका अप्रतिम प्रणयी कवितेतील काही ओळी. अर्धोन्मिलित अवस्थेत असताना, निद्रीस्तावस्थेत जाणवणाऱ्या मुग्ध प्रणयाची सुंदर छटा आपल्याला या ओळींतून प्रतीत होते. आदल्या रात्रीच्या जागरणाने डोळ्यांवर गुंगी यावी […]

1 11 12 13 14 15 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..