ज्येष्ठ गायक कुंदनलाल सैगल
कुंदनलाल सैगल यांचा जन्म जम्मू येथे एका मध्यमवर्गीय सुशिक्षित पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी झाला. त्यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. ती सैगल यांना बालपणी धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन, यांसारख्या पारंपारिक शैलीत गायिल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयात सैगल […]