नवीन लेखन...

प्रतिक्रया : (१) सरस्वती-सिंधु संस्कृती; (२) सिकंदर व चंद्रगुप्त; (३) आर्य व द्रविड

नुकतेंच, लोकसत्ता, मुंबई आवृत्तीमध्ये, ‘जे आले ते रमले’ हें सुनीत पोतनीस यांचें सदर सुरूं झालें आहे. या सदरात वर्षभर बरेच उपयुक्त व इंटरेस्टिंग मटीरियल वाचायला मिळेल अशी आशा आहे. परंतु, या सदरात आत्तांपर्यंत जो मजकूर आलेला आहे, त्याबद्दल कांहीं ‘जास्तीची’ (additional) माहिती पुढें ठेवणें मला आवश्यक वाटतें, म्हणून ही प्रतिक्रिया. […]

श्री नृसिंह अवतारकथा

प्रल्हादासी करितो नमन   बालक असुनी महान अणुरेणूंत असे भगवान   दाखवूनी देई जगाला   ।।१।। बघावी सृष्टी   ठेऊनी संत द्दष्टी त्यासी दिसेल जगत् जेठी   सर्व ठिकाणीं   ।।२।। प्रल्हादाचे तत्वज्ञान   प्रभुमय सारे जग् जीवन त्यासी घ्यावे ओळखून  श्रद्धा द्दष्टीनें   ।।३।। अपूर्व प्रभू भक्ति  उन्मत्त असूरी शक्ति संघर्षकथा होती   भक्त  प्रल्हादाची   ।।४।। बहूत महान वीर  प्रभुपुढे कोण टिकणार परि प्रभूसीच […]

बासरी वादक, लेखक पंडीत अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर

तरुणपणी वाद्यसंगीताकडे आकृष्ट झालेल्या गजेंदगडकर यांनी प्रख्यात बासरीवादक पन्नालाल घोष आणि मुरलीधर शास्त्री यांच्याकडे बासरीवादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले होते. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९२८ रोजी नाशिक येथे झाला. बासरीवादनाच्या पलिकडे संगीतकार आणि संगीत समीक्षक अशीही गजेंदगडकर यांची ओळख होती. स्वरमंडल या वाद्याचे वादन करणारे ते एकमेव कलाकार होते. सारंगी आणि व्हायोलिन वगळता सर्व प्रकारची वाद्ये वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता. ऑल […]

आर.डी. बर्मन यांचे रिदम ऍरेंजर मारुतीराव कीर

मारुतीराव कीर यांनी आपले करियर तबला वादक म्हणून सुरू केले. त्यांचे गुरु होते भानुदास मानकामे, भैरव प्रसाद, सुंदर प्रसाद आणि उस्ताद गेमखान साहब होते. मारुती राव कीर यांनी शंकर जयकिशन यांच्या व्यतिरिक्त जवळजवळ सर्व संगीत दिग्दर्शकांच्या बरोबर काम केले. जवळजवळ सर्व जुन्या मराठी चित्रपटांमधून आणि नॉन-फिल्मच्या गाण्यांमध्ये मारुती राव कीर यांनी तबला वाजवला आहे. मारुती राव […]

प्रसिद्ध गायीका आशा खाडिलकर

ज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. कारण त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५५ मध्ये सांगली येथे झाला. त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. ही ऊर्जा मूळच्या गाण्यापेक्षा आशाताईंच्या अंतरातून आलेली असते. त्यामुळेच आशाताई जेव्हा एखादं गाणं गातात,तेव्हा ते तत्पूर्वी कुणीही गायलेलं […]

ज्येष्ठ गायक पं. अजित कडकडे

कडकडे कुटुंबीय मूळचे गोव्याजवळील डिचोली गावचे. इंटरपर्यंतचे त्यांचे शिक्षण गोव्यातच झाले. कडकडे घराण्यात किंवा आजोळीही गाण्याचा वारसा नव्हता. केवळ घरच्यांनी सांगितले म्हणून ते गोव्यातील माडीये गुरुजींकडे गाणे शिकायला जाऊ लागले. अजित कडकडे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे पं. गोविंदराव अग्नी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची […]

श्री विठ्ठल अवतार

(श्री भक्त पुंडलीक कथा) श्री विठ्ठलाचे चरणीं   विनम्र होऊनी दर्शन घेई मागुनी    मी तुझा भक्त   १ पुंडलीकास देई दर्शन    नसूनी भक्ती तव चरण सेवा माता-पित्यांची करुनी    तुजसी पावन केले   २ सेवा आई-वडीलांची करीसी    परी प्रभू पावन झालासी ही भक्तिची रित कैसी    समज न येई कुणा   ३ तपाचे मार्ग वेगवेगळे    सर्व प्रभू चरणी मिळे हे कुणास न […]

‘LGBTQI’ जनांसाठी नवी आशा

समाजातल्या मेजॉरिटीपेक्षा भिन्न असलेल्यांना बरेच कांहीं सोसावें लागतें, कारण समाजातील प्रथा, परंपरा या, केवळ मेजॉरिटीला ध्यानात घेऊन बनवलेल्या असतात. मात्र, अशा परंपरा भूभागसापेक्ष, संस्कृति-सापेक्ष व कालसापेक्ष असतात. काळाबरोबर जसजसा समाज बदलतो, तसतसे मान्यताप्राप्तीचे निकषही बदलतात.

‘LGBTQI’ कम्युनिटीला गेली अनेकानेक शतकें-सहस्त्रकें समाजरोष पत्करावा लागला आहे,  अन्याय्य  असा एक  ‘डाग’ बाळगत जगावें लागलें आहे. जें कांहीं Natural ( पण मेजॉरिटीपेक्षा भिन्न) आहे, ते समाजानें, सरकारनें आणि न्यायपालिकेनें आजवर शिक्षापात्र गुन्हा मानलें होतें. मात्र, आतां सुप्रीम कोर्टानें या विषयावर पुनर्विचार करण्याचें ठरवलें आहे. त्यातून या कम्युनिटीला योग्य तो न्याय मिळेल, अशी आशा करायला हरकत नाहीं. […]

पंडित सी.आर.व्यास

सुरूवातीला सी.आर.व्यास यांनी महाराष्ट्रातील बासरी गावातील पंडीत गोविंदराव भातांबेकर यांच्याकडे धडे घेतले. त्यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९२४ रोजी झाला. पुढे पंडीत सी. आर. व्यास मुंबईमध्ये स्थायिक झाले पण त्यांनी ग्वालियर घराण्यातील राजारामबुवा पराडकर यांच्याकडे प्रशिक्षण घेणे सुरू ठेवले. आग्रा घराण्याच्या पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सांगितिक कौशल्य अधिक बहरले. अनेक दशके पंडित सी.आर.व्यास यांनी जुन्या आणि नविन […]

हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक बासू चटर्जी

सहायक दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू करणा-या मा.बासू चटर्जी यांनी दिग्दर्शक म्हणून रजनीगंधा, चितचोर, छोटीसी बात, खट्टामीठा, बातों-बातों में सारखे सुंदर चित्रपट दिले. त्यांचा जन्म १० जानेवारी १९३० रोजी झाला. स्वच्छ मनोरंजक चित्रपटात विविधता देणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटाची गती वाढवली. त्यांचे एकाच वर्षात दोन चित्रपट येणे सुरू झाले. बासूदा आपल्या चित्रपटांतून मध्यमवर्गाची छोटीसी बात सांगत. मुंबईतील […]

1 149 150 151 152 153 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..