नवीन लेखन...

अभिनेता व दिग्दर्शक अभिराम भडकमकर

नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात गेली दोन दशकं लेखक, अभिनेता व दिग्दर्शक म्हणून वावरणाऱ्या अभिराम भडकमकर यांचा जन्म ७ जानेवारी १९६५ रोजी झाला. नाटक, सिनेमा, कथा, कादंबरी या सर्वच क्षेत्रात सहजपणे वावरणारा हा कलावंत.. रुढार्थानेसुद्धा कलावंतच… कारण तो अभिनयसुद्धा करतो… आजच्या घडीला उत्तम आणि दर्जेदार लिहिणा-या लेखकांपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे अभिराम भडकमकर… चुड़ैल हा कथासंग्रह असो […]

लेखीका आणि स्तंभलेखक शोभा डे

मूळच्या शोभा राजाध्यक्ष. त्यांचे वडील डिस्ट्रिक्ट जज होते. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९४८ रोजी झाला. शोभा डे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली. तरूण वयात मॉडेल म्हणून मोठे नाव कमावल्यानंतर त्यांनी १९७० मध्ये पत्रकारिता सुरु केली. त्यांचे पती दिलीप डे. पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीयांच्या सांस्कृतिक- सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडित […]

लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्याी नावाजलेल्या मराठी लेखिका डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर

डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. “Contribuiton of Women writers in Marathi Literature” या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर […]

चंद्रकांत रघुनाथ गोखले

अभिनयातलं कर्तृत्व आणि सार्वजनिक जीवनातलं दातृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठ ठरलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत गोखले. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. त्यांचे बालपण मिरज इथेच गेले. अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं ते आपली आजी दुर्गाबाई आणि आई कमलाबाई यांच्याकडून. “चित्ताकर्ष’ ही त्यांची घरची नाटक मंडळी होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे कमलाबाई आपल्या मुलांना बरोबर घेऊन विविध […]

अभिनेत्री रीना रॉय

रीना रॉय यांचे खरे नाव रुपा सिंह. तिचा जन्म ७ जानेवारी १९५७ रोजी मुंबई येथे झाला. रीना यांचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. रीना रॉय यांच्या आईवडिलांचे लग्न फार काळ टिकले नाही, चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ते रीनाची आई आणि आपली चारी अपत्ये सोडून चेन्नईला निघून गेले. आई आणि बहिण-भावांच्या उदरनिर्वाहासाठी रीनाने वयाच्या […]

समय है ‘युग’परिवर्तन का

शेवटी युग पाठक यांना अटक झाली. त्यांना पश्चाताप होत असावा, असं ते स्वत:हूनच पोलीसांसमोर हजर झाले त्यावरून वाटतं. श्री. युग पाठक यांना फारशी शिक्षा होऊ नये असं मला मनापासून वाटतं. कारण, पश्चाताप होणं हेच सर्वात मोठं प्रायश्चित आहे, असं आपलं अध्यात्मही सांगतं. श्री. युगजी पाठक गेले सततचे ९ दिवस या पश्चातााच्या आगीत होरपळले आहेत, येवढी शिक्षा त्यांना पुरेशी आहे. ‘शरण आलेल्याला मोठ्या मनाने माफ करावं’ हे ही भारतीय तत्वज्ञानाशी सुसंगतच आहे..! ’युग’परिवर्तन म्हणतात, ते बहुदा हेच असावं..!! […]

शिवी : हृदयाचा सेफ्टी व्हाॅल्व्ह !

शिवी हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य भाग असतो. शिव्यांच्या शब्दांवरून, पद्धतीवरून त्या त्या भागातील संस्कृती समजते. कोकणात तर ‘शिवी’ ही ‘ओवी’ म्हणूनच स्विकारली जाते. शिवी देणा-याला काही वाटत नाही आणि घेणा-याला तर त्याहून काहीच वाटत नाही. […]

काळजाला हात घालणारा गायक : मुकेश

प्रत्येक व्यक्तीच्या घशात “व्होकल कॉर्ड’’ नावाचा अवयव निसर्गत: असतो. एक अत्यंत पातळ पापूद्र्या सारखा दिसणारा हा अवयव आम्हाला बोलताना किंवा गाताना मदत करत असतो. मी कुठे तरी वाचल्याचं आठवतं की लता दिदीनी आपल्या घशाचा विमा उतरविला आहे. कारण त्यांचा घसा हाच सर्वात महागडा असा अवयव आहे. निसर्गत:च आवाजाची देगणी अनेक कलावंताना लाभलेली असते मात्र प्रत्येक आवाजाचा […]

‘शिवाजी’ हे नाव आयुष्यभर सन्मानपूर्वक धारण करणारा अभिनेता शिवाजी गणेशन्

विल्लुपूरम चिनय्या गणेशन हे त्यांचे मूळ नाव. दक्षिणेत “श” ऐवजी “स” चा वापर होतो म्हणजे सिवाजी गणेसन. मध्यमवर्गीय तमीळ कुटूंबात त्यांचा जन्म झाला. एकदा शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर बेतलेल्या नाटकात त्यानां मूख्य भूमिका मिळाली. नाटकाचे नाव होते “शिवाजी कंदा हिंदू राज्यम्” यातील शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. एका सार्वजनकि सभेत त्यावेळचे प्रसिद्ध समाजसेवक ई.व्ही.रामास्वामी यांनी त्यांचा “सिवाजी” असा उल्लेख केला आणि नंतर आयुष्यभर त्यांचे हेच नाव रूढ झाले. काय गंमत आहे बघा तमीळ ‘विल्लुपूरम चिन्नय्याचा’ शिवाजी गणेशन झाला तर मराठी ‘शिवाजी गायकवाडचा’ तमीळ रजनीकांत झाला. आणि दोघेही आपापल्या काळातले श्रेष्ठ अभिनेते ठरले. […]

1 152 153 154 155 156 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..