भ्रष्टाचारावर उपाय आहे, पण तो करायची आपली तयारी आहे काय?
आपल्या जीवावर निवडून आलेल्या राज्यकर्त्यांकडून आणि आपल्याच पैशांवर मिळणाऱ्या सातव्या-आठव्या वेतन आयोगाच्या पगारावर पोसली जाऊनही पुन्हा आपल्यालाच लुबाडायला तयार असणाऱ्या नोकरशाहीकडून आपण ‘डंके की चोट’पर नागवले जातोय हे कळतंय, पण आता नेमकं काय करावं, हे न कळल्याने निर्माण झालेल्या असहाय्यतेतून, सार्वजनिक यंत्रणाविषयीची सामान्य जनतेच्या मनातली पराकोटीची चीड मी गेले दोन-तिन दिवस अनुभवतोय. या सर्वाॅचा मला एकच प्रश्न होता, की हे संपणार आहे की नाही? संपणार असेल, तर कधी? आणि कसं?… हेच सुचवणारा माझ्या ‘अस्वस्थ मन’ या नविन सदरातील पहिला लेख. […]