नवीन लेखन...

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सतारवादक उस्ताद रईस खान

आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सतारवादक उस्ताद रईस खान यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३९ रोजी इंदौर मध्य प्रदेश येथे झाला. त्यांचे आजोबा इनायत अली खान हे भारतीय उपखंडातील एक अव्वल सतारवादक म्हणून प्रख्यात होते. रईस खान यांनी वडील मुहम्मद खान व चुलते वलायत अली खान यांच्याकडे सतारवादनाचे धडे घेतले. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा […]

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार अमोल पालेकर

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार अमोल पालेकर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४४ रोजी झाला. चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध भूमिका करत असलेले अमोल पालेकर यांचे वडील पोस्टात काम करत असत, आणि आई खाजगी कंपनीत काम करत होती. खरे तर, पालेकर चित्रकार व्हावयाचे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून फाइन आर्टची पदव्युत्तर पदवी प्राप्त […]

पटकथा आणि संवादलेखन सलीमखान

पटकथा आणि संवादलेखन सलीमखान यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. सलीम खान यांनी जरी फार कमी काळ या सिनेसृष्टीला दिला तरी त्यांच्या योगदानासाठी त्यांचे नाव नेहमीसाठी घेतले जाईल. कितने आदमी थे” – शोले “मेरे पास मां है”, – दिवार “डॉन को पकडना मुश्कील हि नाही नामुमकीन है”… या सारखे संवाद सिनेसृष्टीत अजरामर झालेले आहेत. पण या […]

विरही बागेश्री

रात्रीच्या शांत समयी, एकांतात भेटलेल्या विरहिणीची तरल मनोवस्था म्हणजे बागेश्री. आपल्या शेजारी बसलेला प्रियकर, साथीला आहे पण तरीही मनात कुठेतरी धडधड होत आहे आणि त्या स्पंदनातून उमटणारी वेदना आणि हुरहूर म्हणजे बागेश्री. बागेश्री रागाच्या या आणि अशा अनेक छटा आपल्याला एकाचवेळी आकर्षित करतात आणि त्याचबरोबर चकित देखील करतात. रागाची मांडणी बघायला  गेल्यास, आरोहात पाच स्वर तर […]

लोकमानस बदलणारी प्रसारमाध्यमे 

आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून लोक फसत असतील तर त्यांचा गांभीर्याने विचार माध्यमांनी करावा? सेलच्या जाहिराती, नियुक्तीसाठी जाहिराती, फसवणूक जोपासणार असतील तर आदर्शांचे अग्रलेख कशासाठी? दिशाभूल करणार्‍या गोष्टी भूल देवून केल्या जात आहे. एकीकडे वैधानिक इशारा द्यायचा आणि दुसरीकडे मृत्यू स्वस्त करायचा असे किती दिवस चालणार? […]

बॉलिवूडच्या जेष्ठ गायिका मीना कपूर

मीना कपूर यांचे वडील विक्रम कपूर हे कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स स्टुडिओचे अभिनेते होते. चित्रपट निर्माते पी.सी. बरुआ हेही त्यांचे नातेवाईक होते. यांमुळे कपूर यांचा चित्रपटात प्रवेश सुकर झाला. मीना कपूर यांनी आपल्या लहानश्या करीयरची सुरवात १९४६ साली नीनु मुजुमदार यांच्या आठ दिन या चित्रपटापासून केली. याला संगीत एस.डी.बर्मन यांचे हो. गायिका मीना कपूर या संगीतकार अनिल […]

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

मराठी गद्य रंगभूमीचे जनक, लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि नवाकाळ दैनिकाचे संस्थापक संपादक असलेल्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८७२ रोजी झाला. सांगली हायस्कूलमध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे शिक्षण झाल्यानंतर तेथेच कांही काळ ते शिक्षकही होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना नाट्यवाङ्मयाचा सूक्ष्म अभ्यास केला. तत्वज्ञान हा त्यांचा खास विषय होता. `सवाई माधवरांचा मृत्यू `हे नाटक लिहून त्यांनी आपल्या नाट्यलेखनास प्रारंभ […]

गीता दत्त

गीता दत्त (पूर्वाश्रमीची गीता घोष रॉय चौधरी) यांचा जन्म बंगालमधील जमीनदार घराण्यात झाला. गीता दत्त यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९३० रोजी झाला. १९४६ साली ललिता पवार यांचे पती हनुमानप्रसाद यांनी प्रथम गीता दत्त यांना गाण्यासाठी पहिला ब्रेक दिला. गीता दत्त यांनी १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. १९४६ ते १९६६ या २० […]

मराठीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे

मराठीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९४८ रोजी गडहिंग्लज येथे झाला.आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. आशा काळे मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचा जन्म गडहिंग्लजचा. आशा काळे यांचे वडील रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते. शासकीय नोकरी असल्याने बदली ठरलेली. आई, वडील, मोठा भाऊ, धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब. रत्नागिरी, पाली, भोर, पुणे, कोल्हापूर […]

अमृता खानविलकर

अमृता खानविलकर हिची कारकीर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या इ.स. २००४ मधील “झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज” या गुणवत्ता-शोधन कार्यक्रमातील सहभागातून सुरू झाली. […]

1 16 17 18 19 20 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..