नवीन लेखन...

नसलं तरी दाखवता आलं पाहिजे

नसलं तरी दाखवता आलं पाहिजे लेव्हलचं सेटींग करता आलं पाहिजे..!! काल केस कापून आलो. आश्चर्य वाटलं ना? डोक्यावर फारसे केस नसताना ते कसे काय कापले बुवा, असंच वाटलं असेल ना तुम्हाला? गंम्मत म्हणजे मलाही याचंच आश्चर्य वाटलं. मी महिन्यातून पाच वेळा केस कापतो. एका वेळेस ८० रुपये लागतात. या हिशोबाने महिन्याचे झाले ४०० रुपये. भरघोस जावळ […]

अलौकिक अडाणा

असेच काही द्यावे….  घ्यावे….          दिला एकदा ताजा मरवा; देता घेता त्यात मिसळला          गंध मनातील त्याहून हिरवा. कवियत्री इंदिरा संत यांच्या “मरवा” कवितेतील या ओळी, “अडाणा” राग ऐकताना, बरेचवेळा माझ्या मनात येतात. वास्तविक पाहता, दरबारी रागाच्या कुटुंबातील, हा महत्वाचा सदस्य पण जातकुळी मात्र फार वेगळी आहे. एकाच कुटुंबातील भिन्न […]

असा पदर पदर

असा पदर पदर, कुयरी नि मोराचा.. दिसे भर्जरी साजरा, गुजराती पद्धतीचा..!! माझं बऱ्याच लग्नसमारंभातून, सोशल गॅदरींगमधून किंवा अशाच काही विशेष घरगुती सोहळ्यांना जाणं होत असतं. बऱ्याच वर्षांपासून मला असं दिसतं की, अगदी फेटेबंद मराठमोळा असलेल्या या कार्यक्रमातून बऱ्याच कुमार-तरुण ललना मला गुजराती पद्धतीची साडी नेसून दिसतात. काही ठिकाणी तर नववधु किंवा सत्कारमु्र्ती असलेली स्त्री ही गुजराती […]

वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग ४

या लेखात आपण आर्द्रा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने साधारणपणे कोणत्या रंग संवादाचे आणि रंग आकार यांचे पेंटिंग आपल्या नजरेसमोर ठेवावे यावर विचार करू. […]

विजेचे दुःख

लपकत आली कडकडाट करुनी गेली प्रकाशमान केले जगासी सारुनी दूर अंधारासी भयाण होता अंधःकार लख्ख प्रकाश देई आधार घेई सर्वांच्या मनाचा ठाव भिती असूनही, प्रसन्न भाव करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन निर्माण झाला मनी अभिमान परि दुःखी होते तीचे मन ‘क्षणिक’  लाभले तिला जीवन   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.com      

पक्षी – मुलातले प्रेम

स्वैर मनानें भरारी घेई,  पक्षी दिसला आकाशीं स्वछंदामध्यें विसरला तो,  काय चालते पृथ्वीशीं…१, एक शिकारी नेम धरूनी,  वेध घेई पक्षाचा छेदूनी त्याचा एक पंख,  मार्ग रोखी उडण्याचा…२, जायबंदी होवूनी पडला,  खालती जमीनीवरी त्वरीत उचलून पक्षाचे,  पाय बांधे शिकारी….३ ओढ लागली त्यास घराची,  भेटावया मुलाला आजारी असूनी पुत्र त्याचा,  चिडचिडा तो झाला…४, चकित झाला बघूनी मुलाला,  अंगणी […]

दोष नव्हता तिचा…

दोष नव्हता तिचा अन् वाट ही नव्हती ती चुकली बदमाशांच्या जाळ्यात अनाहुतपणे होती फसली उन्मत्त नशेने माजून ते सैतान झाले होते विकृत ओंगळ भावनेला पूरूषार्थ समजत होते मनावरच्या आघाताने जरी नव्हती ती खचली आत्मसन्मानाची लढाई जिंकू नव्हती शकली विधात्यालाही नाही कळले  विकृत हवस ती कसली नीच त्या नराधमांनी माणूसकीलाही भोसकली आंधळ्या त्या न्यायदेवतेला होते सारे स्पष्ट […]

वरळी कोळीवाड्याची देवता श्री गोलफादेवी..

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा- मुंबईचे आद्य रहिवासी म्हणजे कोळी. मुंबईमध्ये कोळी समाज मुंबई ही ‘मुंबई’ म्हणून ओळखली जाण्यापुर्वीपासून वास्तव्यास आहे. म्हणून तर मुंबई ही कोळ्यांची असे सांगतात. कोळी आणि त्याचं कुटुंब, अश्या सर्वांचच आयुष्य समुद्राशी, त्याच्या लहरीपणाशी, त्याच्या भरती-ओहोटीशी घट्ट निगडीत असल्याने त्यांची वसती समुद्र किनाऱ्यांवर असणं अगदी साहजिक असतं. समुद्रच यांचा माय-बाप, त्यानुळे चुकला कोळी […]

नऊवारी लुगडं..

‘लुगडं’ म्हटलं की अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना जागृत होत असतील. कुणाला आजीच्या, आईच्या जुन्या लुगड्यापासून बनवलेल्या उबदार गोधडीची आठवण येईल, तर कुणाला आठवणीतल्या कुणाच्या तरी शालुरूपी लुगड्यावरील ‘पदरावरचा जरतारीचा मोर..’ उगाचंच अस्वस्थ करेल. मला मात्र लुगडं हा शब्द ऐकला की, नऊवारी साडीच डोळ्यासमोर येते. वास्तवीक नव्वार किंवा नऊवार हे कापडाच्या लांबीचं माप आहे, नेसायची पद्धत […]

WHO …!

तरुणांचे मानसिक आरोग्य सांभाळा…. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन ! या वर्षा साठी WHO ने थीम दिलीय ते बदलत्या जगात तरुणांचे मानसिक आरोग्य ….. या जगात शाश्वत फक्त ‘बदल’ आहे. कधी तो खूप हळू असतो तर कधी खूप जोरात. इंटरनेट च्या भन्नाट क्रांती ने हल्ली जग भयंकर वेगाने बदलत आहे. 6 महिन्यांपूर्वी नवल असलेली गोष्ट आजच […]

1 32 33 34 35 36 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..