लोकनायक….. राज ठाकरे !
सत्तेच्या राजकारणात निवडणूका या अत्यंत महत्वाच्या असल्या तरी जनमाणसांच्या मनात आपुलकीचं नातं निर्माण करणारा नेता हाच खरा लोकनायक समजला जातो. प्रत्येक राजकीय पक्षाला संघर्ष हा करावाच लागतो. निवडणुकीत जय – पराजय हा नित्याचाच आहे. उतार चढाव हा तर राजकारणाचा स्थायीभावच आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. आणि सध्या अशा संघर्षातून राज ठाकरे नावाचा योद्धा तावून सुलाखून बाहेर पडत आहेत. […]