मनस्वी यमन
आपल्या भारतीय संगीतात, रागांच्या प्रकृतीनुसार त्याचे वर्गीकरण केलेले आहे आणि त्याला “थाट” असे म्हणतात, जसे, “मारवा थाट”,”कल्याण थाट” इत्यादी. त्यानुसार, हा राग “कल्याण” थाटात येतो तसेच गमतीचा भाग म्हणजे. आपले उत्तर भारतीय संगीत आणि दक्षिण भारतीय संगीत, यात बरीच देवाणघेवाण चालू असते. दक्षिणात्य संगीतात, याच रागाशी मिळता जुळता असा “कल्याणी” नावाचा राग ऐकायला मिळतो. अर्थात, स्वर […]