राजस यमन
चालायला सुरवात करताना, साथीला ३ ४ झाडांची साथ असताना, हळूहळू, नजरेसमोर हिरव्या गर्द वृक्षांची दाटी होऊन, त्यातच आपले मन गुंतून जावे त्याप्रमाणे यमन रागाचे काहीसे वर्णन करता येईल. तसे बघितले तर, सगळ्याच रागांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात असलाच अनुभव येतो म्हणा. यमन राग हा बहुदा एकमेव राग असावा, ज्या रागाची सुरवात “सा” स्वराने न होता, “नि” स्वराने होते म्हणजे “नि” […]