नवीन लेखन...

सामाजिक शिष्टाचार – लक्षपूर्वक ऐकणे

एकमेकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय एकत्रपणे काम करताच येत नाही. ऐकण्याचे महत्व कशासाठी ? दुसर्‍याचे ऐकून घेणे व कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे आजूबाजूच्या निरनिराळ्या आवाजातील हवा तो नेमका आवाज निवडून त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे. कोणत्या आवाजाकडे लक्ष देणे हे त्या त्या वेळच्या गरजेवर अवलंबून आहे. […]

माझी पहिली चित्रपट कथा

रात्री पडल्या पडल्या सहज विचार केला चित्रपटासाठी एखादी कथा लिहावी आणि कथा लिहुन पण टाकली. माझी कथा कोणी स्विकारण शक्यच नव्हत तरी पण एक तुक्का लावला. मला तर वाटतय काहीशे कथातुन माझी कथा लकी ड्राँ’ पद्धतीनी काढली गेली असावी! […]

श्रद्धांजलि ।

सुळीं दिले येशूला   वेडेपणाच्या भरांत खिळे ठोकले अंगाला   रागाच्या ओघांत   ।।१।। समर्पण केले देहाचे   परि न सोडी ध्येय बलिदानाच्या मार्गाचे   हेच महत्व होय   ।।२।। सुळावरी तो जातांना   वदला आकाशी बघूनी क्षमा कर प्रभू त्यांना    ते आहेत अज्ञानी   ।।३।। कळले नाहीं ज्ञान   अज्ञान सागरांत जाणले तत्वज्ञान    उशीर केला त्यांत   ।।४।। उपयोग नाही आतां   वेळ गेली निघूनी जाण […]

विहीण

माझ्या विहीणाई बाई तुम्हा बहीण मानते जपली जी अमानत तुम्हा हाती सोपवते द्यावी मायेची सावली पुन्हा पुन्हा विनवते कधी सोसलेना तिने उन्हातान्हाचे चटके तिच्या सोनपावलांची दारी उमटली नक्षी आनंदाने भारारला गगनात तेव्हां पक्षी अशी अंगणी खेळता कधी झाली पहा मोठी अजूनही सान बाळी तिच्या बाबा दादासाठी कन्या परक्याचे धन किती सांगू या मनाला हृदयाच्या हुंदक्याला आता […]

डॉ . मानसी आपटे : एक जिद्दी मुलगी

शालांत परिक्षेत मराठीत सर्वाधिक गुण मिळाल्यावर साहजिकच मानसीने कला विभागाकडे जाणे अपेक्षित होते. परंतु विज्ञानाची रंजकता अनुभवल्यामुळे तिने विज्ञान शाखेत केळकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिच्या विज्ञान संशोधकवृतीला खरा फुलोरा आला तो पदवीसाठी सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय घेऊन राम नारायण रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर […]

भाव जाण तू देवा

कर पडले चरणीं भाव जाण तू देवा   ।।धृ।।   देह झुकला तुझ्या पुढती लिनतेनें मान वाकती मनाची करूनी एकाग्रता भावनेला वाट देतां अश्रू दाटले नयनी  अंतरीचा दिसे ओलावा    १ कर पडले चरणी   भाव जाण तू देवा,   प्रथम येई भावना, जागृत करते ती मनां मनाचा ताबा देहावरी तोच तुजला प्रणाम करी घे प्रभू तू जाणूनी   अत:करणातील […]

सामाजिक शिष्टाचार – वक्त्याचे सादरीकरण

श्रोत्याने वक्त्याचे बोलणे ऐकणे जसे महत्वाचे तसेच वक्त्यानेही श्रोत्याचे लक्षवेधक बोलणे महत्वाचे. अगदी हजारोंच्या सभा गाजवणारे वक्तृत्व प्रयत्नपूर्वक कमवावे लागते. पण मिटींगमध्ये आपले म्हणणे मांडण्यासाठी लागणारी वक्तृत्वकला थोड्या प्रयत्नाने सहज साध्य होऊ शकते. […]

स्वर्गातही सोशल मिडीया साकारणार

पृथ्वीवरच्या सोशल मिडियाची खबर काही चुगलखोर आत्म्यांनी स्वर्गात पोहोचवली. एक दोन, ए ग्रेड अप्सरांनी नारदाच्या मदतीने लगेच इंद्राचे कान भरले. मानव निर्मित सोई सुविधांचे अनुकरण देवाधिकांनी करण्याविषयी इंद्राच्या मनात थोडी चलबिचल झालीही परंतु, ” स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाचा दरबारात इफेक्टीव्ह कम्युनिकेशन टुल म्हणून वापर करुन आपण सर्व अप्सरांच्या हलचालींवरही लक्ष ठेउ व सतत सर्वाच्या टचमधे राहू शकु ” या स्वार्थी हेतूने इंद्रानी स्वर्गातल्या सोशल मीडियाला तत्वत: होकार दिला आणि सर्व अप्सरांची मीटिंग बोलावली. […]

भोंडला (सेलचा) (८)

अरडी ग बाई, परडी रस्त्यावरती गर्दी ही गर्दी कशाची ही गर्दी सेलची चला चला मैत्रिणींनो सेलला स्वस्त्यात कपडे आणायला स्वस्त्यात साड्या आणायला सुधाताई मंदाताई आणायला दुकानदाराची चलाखी ८०० ची साडी ५०० ला ५०० चा ड्रेस ३०० ला चला चला मैत्रिणींनो सेलला स्वस्त्यात कपडे आणायला स्वस्त्यात साड्या आणल्या घरी नेऊन पाहिल्या ड्रेसचा रंग झला फिका वाया गेला […]

नाच ग घुमा (२)

नाच ग घुमा नाच ग घुमा कशी मी नाचू ह्या गावचा त्या गावचा ऑर्केस्ट्रा नाही आला रिदम नाही मला कशी मी नाचू ह्या कोपर्‍यावरचा त्या कोपर्‍यावरचा टेलर नाही खुला नवा ड्रेस नाही मला कशी मी नाचू ह्या रोडचा त्या रोडचा पार्लर नाही खुला मेकप नाही मला कशी मी नाचू ह्या गावचा त्या गावचा शूमार्ट नाही खुला […]

1 44 45 46 47 48 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..