भोंडला (बसचा) (७)
अरडी ग बाई, परडी रस्त्यावरती गर्दी ही गर्दी कशाची ही गर्दी बसची बस आली बस आली पकडा पकडा पुढच्याला मागे ढकला ढकला असेच होतात अपघात टाळणे तुमच्या हातात थांब्यावरती थांबा थांबा शिस्तीत लावा रांगा रांगा उतारूंना उतरू द्या पुढच्याला पुढे होऊ द्या प्रवास तुमचा होईल छान समूहाचे ठेवा भान अंगी बाणा शिस्त शिस्त शिस्तीवरती ठेवा भिस्त