घाणे
आधी मूळ धाडा अष्ट गणेशांना इच्छिल्या कार्याला शुभारंभ । आधी मूळ धाडा बापुजी देवाला घरच्या कार्याला हातभार । आधी मूळ धाडा कार्ला गडावरी बैसोनी अंबारी येई माते । आधी मूळ धाडा सप्तश्रुंगावरी भगवतीची स्वारी येई कार्या । आधी मूळ धाडा कृष्णेला वाईच्या मान आजोळीचा आहे तिचा । आधी मूळ धाडा जेजूरी खंडेराया बहिणीच्या कार्या पाठी उभा […]