बंद खिडकी
चालताना त्या रस्त्यावर आज का अडखळली मम पाऊले तोच रस्ता मीही तोच परी का सर्व अनोळखी भासले । त्याच रस्त्यावरील तेच घर परी आज अपरिचित वाटले बंद खिडकी ती पाहून घराची मम नयनी अश्रु का दाटले । अजूनही वाटते कधीतरी ऊघडेल ती खिडकी कुणीतरी पुन्हा तो ओळखीचा चेहरा पाहील वाकून त्या खिडकीतूनी । सुरेश काळे मो.9860307752 […]