नवीन लेखन...

महिंद्र साउथ आफ्रिका

UB group मधील नोकरीचे “बारा” वाजायला लागल्यावर, नवी नोकरी शोधणे क्रमप्राप्त होते. वास्तविक, या नोकरीत स्थिरस्थावर व्हायची इच्छा होती पण प्रारब्ध वेगळेच होते. Standerton हे गाव, म्हणावे अशा अटकर बांध्याचे आहे. आजूबाजूला कुठलेच शहर नजरेच्या टप्प्यात नाही. जुन, जुलै महिन्यात हाडे गारठवणारी थंडी असल्याने, लोकवस्ती तशी विरळ!! सुदैवाने, माझ्याच ओळखीत, जोहान्सबर्ग इथे एका कंपनीत, नोकरी संदर्भात […]

मायेचा स्पर्श

दिवाळीच्या सुंदर दिव्यांवर अती उत्साहाने फूंकर घातली …आणि फटाक्यांची माळ माझ्या हातातच फूटली जखम पाहुन सारी हळहळली वेदना मला ती असह्य झाली छोटी अनु जरी घाबरली धीर दिला मला,नाही ती रडली अगदी शांतपणे येऊन माझ्या उशाशी ती बसली मांडीवर डोकं घेऊन  मायेने हात फिरवु लागली मी बळेबळे हसलो पण ती नाही फसली माझी वेदना तिच्या डोळ्यात […]

अटकर बांध्याचा हंसध्वनी

भारतीय रागसंगीतात एकूणच, बहुतेक सगळे राग हे, धार्मिक, भक्तीभाव समर्पण, प्रणयी किंवा दु:खी असेच भाव दर्शविणारे आहेत. अर्थात ह्या भावना, आपल्या संस्कृतीचा स्थायीभाव असल्याने, या भावनांचे प्रतिबिंब, कलेवर पडणे साहजिक आहे. या समजाला छेद देणारे काही राग आहेत, त्यात हंसध्वनी रागाचा समावेश होतो. एकूणच या रागाची ठेवण, आनंदी, उत्फुल्ल अशी आहे. खरेतर हा राग, कर्नाटकी संगीतातून […]

जयदेव-एक अपयशी संगीतकार!!

खरतर, जयदेवला “अपयशी” संगीतकार म्हणण तस योग्य नव्हे, कारण, त्याने असे स्वत: कधीच म्हटल्याचे मी तरी वाचलेले/ऐकलेले नाही. आयुष्याचा बराच काळ सचिन देव बर्मन यांचा सहाय्यक म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे, सतत त्यांच्या सावलीतच त्यांचे जीवन व्यतीत झाले असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. अर्थात, जेंव्हा, केंव्हा स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली, तेंव्हा मात्र, त्यांनी स्वत:चा दर्जा दाखवून दिला. […]

नोटबंदीनंतरच्या गावगप्पा

येथे फक्त ज्या वैध नोटा बॅंकेत परत आल्यात त्याचाच विचार केला आहे. ज्या नोटा वैध नव्हत्या व बॅंकेत आल्या नाहीत त्याचा विचार केलेला नाही. अशा नोटांची संख्या ही कोणत्याही वेळी १० टक्के पेक्षा जास्त होती हेही विसरून चालणार नाही. […]

तो आणी ती

दोघांची विचारसरणी, आवड जरी वेगवेगळी असली तरीही एकमेकासाठी आपल्या आवडीला दोघांनी थोडीशी मुरड घातली व आपल्या सहचाऱ्याचा त्याच्या आवडी निवडीचा थोडा जरी विचार केला तरी त्यांचा संसार आनंदाने फुलून जातो. ऊलट प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले तर जागोजागी आपणास एकतर विभक्त झालेली किंवा ओढूनताणून संसार चालवणारी जोडपी पहावयास मिळतील. […]

अंतराय

शांत नितळ सागरातलं वादळ तसा तुझा बासरीचा सूर.. घनगंभीर तरी मोहक, व्ययातील तारकामंडलाला व्यापणारा… कोटी स्वर भास्करांचा महामेरू सहज पेलणारा… कित्येक युगांची तृषा जागवणारा… माझ्या स्पदनांनी ही अंतराय निर्माण करणारा… मंञमुग्ध करणं ही जादूगिरी तुझी.. त्या अनवट स्वरांवर अलवार हींदोळे घेणं भाग्य जन्मांतरीच… कुठे शोधायचं तुला?कसं रोखायचं स्वतः ला..? पापण्यांचे कवडसे एकदा तरी खुले कर…. प्रत्येक […]

स्वप्न पहावीत…

स्वप्न पहावीत… नाही कोण म्हणतंय ? स्वप्नं जरूर पहावीत.  इतकी सारी पहावीत की त्यांची ढिगारे व्हावीत. भान ठेवून उघड्या डोळ्यांनी  त्या स्वप्नांकडे पहावं. निर्धाराच्या अचूक बाणाने  त्या स्वप्नांना वेधावं. स्वप्नांसाठी आजच्या वर्तमानाला  निरर्थक नाही मारावं. उद्यासाठी आजच्या क्षणाला  व्यर्थ नाही टाळावं. अशक्य अश्या स्वप्नांसाठी  शरीराने जरूर थकावं. पण न खचता मनानं  पून्हा धैर्यानं उठावं. तुटलेल्या मोडलेल्या […]

वनमाळी सांवळा (श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानें )

गोपी : तेजस नीलमण्यांचा मळा राजस वनमाळी सांवळा ।। नयनमनोहर रूप सांवळें मनीं उतरलें कैसें, न कळे न होइ तृप्ती, बघण्यां होती नयनिं प्राण गोळा ।। नील कमलदल, भ्रमरपुंजही श्यामल यमुना, श्यामला मही नीलमेघ जलभरले, तैसा हा घनश्याम निळा ।। मोरपीस शोभतें शिरावर श्यामल तनुस खुलवी पीतांबर कटीं बासरी, करीं घोंगडी, तुलसीमाळ गळा ।। किति सांगूं […]

बाळक्रीडा अभंग क्र.२४

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते. […]

1 69 70 71 72 73 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..