नवीन लेखन...

बाळक्रीडा अभंग क्र.२३

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते. […]

साउथ आफ्रिका – भाग ८

साउथ आफ्रिका हा देश, तसे पहिले गेल्यास, आफ्रिका खंडातील युरोप!! हवा बरीचशी युरोपप्रमाणे थंडगार असते. अगदी, उन्हाळी दिवस(सध्या इथे उन्हाळा सुरु आहे!!) आले तरी देखील, मुंबईप्रमाणे, घामाने अंग उकडून गेले आहे, असा प्रकार फारसा किंवा अजिबात होत नाही. इथली हवामानाची एक फार सुंदर मजा आहे. समजा, सतत २ ते ३ दिवस कडक(इथल्या मानाने!!) उन पडले की […]

निसर्गरम्य पहाडी

डोंगर उतरणीवरून खाली येताना, मागून चंद्र उगवावा आणि पायाखालची वाट उजळून जावी. आजूबाजूला हिरवी झाडी आणि प्रचंड वृक्षांची साथ असावी आणि बाजूनेच एखादा पाण्याची ओहोळ आपल्या निरव आवाजाने साथ देत असावा. आसमंतात अन्य कुठलाच आवाज नसावा. अशा वातावरणात बहुदा “पहाडी” रागाचा जन्म झाला असावा. अर्थात, निसर्ग आणि प्रदेश याचे ओतप्रोत दर्शन या रागातून सतत झुळझुळत असते. […]

वेदनेचा सुरेल अविष्कार – मदनमोहन

आपल्याकडे‘यशस्वी’ म्हणून गणना करताना व्यावहारिक यश हाच एकमेव निकष वापरला जाऊन त्यानुसार गुणवत्ता ठरवली जाते. अर्थात, व्यावहारिक यशाकडे संपूर्ण कानाडोळा करणे तसे चूकही आहे; पण तोच एकमेव निकष मानणे तितकेसे योग्य नाही. परंतु हाच निकष आजवर सर्रास लावल्याने हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक गुणवान संगीत दिग्दर्शकांवर अन्याय झालेला आहे. मदनमोहन हे त्यातील एक ठळक नाव. मदनमोहन यांच्या […]

पर्यावरणाची जाणीव

एकनाथराव यांची मला गम्मत वाटते. त्यांची विचारसरणी सतत काहीं तरी क्रियात्मक घटनामध्ये व्यस्त असते. अतिशय छोट्या गोष्टी. मात्र खोलांत शिरलो तर त्यातून एखादे महान तत्वज्ञान कळू लागते. हे किती क्षुल्लक, मला हे कां सुचले नाही. ह्याची खंत मनांत येते. […]

लक्ष्मीसूत

आशीर्वाद दे ग आई मजला,  विनवितो मी तुझाच पूत्र, बाबा माझे नसती हयात,  कोण मजला ह्या जगतात, ‘केशव’ माझे वडील असता,  ‘केवशसूत’  हा ठरतो मी, तसाच बनता  ‘केशवकुमार’,  मोठे होण्याची युक्ती नामी जगावयाचे जर मोठ्या नामी,  तूच मजला महान आहे ‘लक्ष्मी’  तुझे नाव असता, ‘लक्ष्मीसूत’ होण्यात पाहे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com      

तप- शक्ती

तप आणि सत्याची,  महान असे शक्ती, वाढवूनी बघा तुम्ही, प्रभूस ती खेचती   तप वाढता तुमचे,  झुकेल तो ईश्वर, हतबल होत असे,  भक्त जणांसमोर,   विश्वाचा तो मालक,  दिसत नाही कुणा, प्रयत्न होवूनी व्यर्थ, निराशा येई मना,   मिळविण्यास जा तुम्ही,  मिळत नसे केव्हां तपशक्ती वाढविता, आपोआप येई तेव्हां   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com   […]

दुर्बल मन नको

सारेच आहेत दुबळे    कुणाते नसे शक्ति वेळ येतां दुर्बल ठरे    जे सबळ समजती  ।।१।। विचार मनी येतां     दुसरा शक्तिशाली समजोनी  जावे तेव्हां    हार तुमची झाली ।।२।। मनाची सबलता    हेच शक्तीचे मापन काय कामाचा देह    दुर्बल असतां मन ।।३।। सुदृढ देह व मन     यांची मिळून जोडी जीवनातील यश    तुमच्या पदरीं पाडी ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

रंग चिकित्सा – भाग ३

आपल्याला राशी – नक्षत्र वगैरे दिसत नाहीत मात्र रंग दिसतात. जी गोष्ट आपल्याला दिसते तीचं ज्ञान घ्यायला नव्हे व्हायला वेळ लागत नाही. ज्या बाबींचे ज्ञान होतं – आकलन होतं – त्यावर आपला चटकन विश्वास बसतो. विश्वास बसला तर उचित परिणाम व्हायला आपले मन आणि शरीर साथ देत असतं. आणि अद्भुतता वाटणारी ही ‘रंग चिकित्सा’ आपल्याशी कधी ऋणानुबंध प्रस्थापित करते हे कळत देखील नाही. […]

श्रावणमास

आला श्रावण मेघ नभातील दूर दूर चालले येता हळुच सर मेघांमधूनी मी ईंद्रधनु पाहिले । कधी ऊन तर कधी पाऊस हा खेळ असे चालला पाहूनी हिरवळ भासे कुणी शालू हिरवा तो नेसला । तुडुंब भरूनी नदी निघाली प्रिय सागर भेटीला ओढ लागली मीलनाची आता दिसे न काही तिला । तरारली पिके शिवारी शेतकरी बहू हरखला अती […]

1 70 71 72 73 74 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..