नवीन लेखन...

फुटबॉल फायनल आणि जानरावची बायको

तुमाले तो माया पुणेवाला सोबती पवन्या आठवते, तो नाही मले नागपूरले ‘ते का करुन रायली असन बा’ पिक्चर पाहाले घेउन गेलता तोच. त्यान मले सांगतल फुटबॉलचा वर्ल्ड कप हाय, मॅचगिच पायजो. मले सारेत असल्यापासूनच फुटबालचा शौक होता. लाथा माराले कोणाले नाही आवडत जी. भेटला बॉल का मारा लाथा. साऱ्या दुनियेचा राग बॉलवरच काढाचा. मास्तरन वर्गाभायेर काढल […]

महाभारतातील स्त्री व्यक्तीरेखा

महाभारत सर्व भारतीयांच्या मनात आदर व विशेषतः हिंदू धर्मीयांच्या भाव भावनांचे प्रतीक. महाभारत किंवा त्यातील विविध पात्रे माहीत नाहीत अशी व्यक्ती सापडणे हे अत्यंत दुर्मिळ. मानवी जिवनातील भावभावनांचे प्रतिबींब आपणास यात पहायला मिळते. माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरणारे काम, क्रोध, लोभ,मोह,मद, मत्सर हे षड्रिपू जर कुठे एकत्रीत पहायचे असतील तर तुम्ही फक्त महाभारत अभ्यासा तुम्हाला ते पावलोपावली […]

मराठी गझल – तुझ्या-विना

तुझ्या विना सखे अता रिते रिते जगायचे तुझ्याच आठवात मी कसे किती झुरायचे मला नकोच वाटते जिणे असे उदास पण तुझा सुगंध भासतो म्हणून श्वास घ्यायचे दुखावल्या मनावरी हळूच फुंकरीन मी सुखावतील वेदना असे मला लिहायचे नभात माळल्यास तू असंख्य तारका जरी तयांस दाखवायला मलाच रात्र व्हायचे तुलाच शोधतात ही अधीर तीव्र स्पंदने तुला लिहीत गात […]

गझल – नको वागणे आज झाडाप्रमाणे

*गझल* *वृत्त :- भुजंगप्रयात* *लगावली :* लगागा लगागा लगागा लगागा नको वागणे आज झाडाप्रमाणे तया लोटते जग कवाडाप्रमाणे धनाचेच लोभी ,महाराज काही किती वागती ते ,लबाडाप्रमाणे सगेसोयरे फार लाडावले तू तरी वार त्यांचेच भ्याडाप्रमाणे तुझे दु:ख आहे, जरी फार मोठे नको वागवू ते , बिऱ्हाडाप्रमाणे कशाला कुणाशी ,अबोला धरावा नसे जिंदगी जर, पहाडाप्रमाणे तुला कर्ण कोणी, […]

श्रावणी

श्रावण आला की मला आमच्या लहानपणीच्या अनेक गमतीशीर आठवणी नजरसमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे श्रावणी. आता तो काळ गेला. मुळात किती लोक जानवे घालतात हाच संशोधनाचा विषय. श्रावणी करणारेही कुणी आढळत नाही. आताच्या पिढीतील मुलांच्या आनंद मिळवण्याच्या विविध गोष्टी बघीतल्या तर आमचे आनंद मिळवण्याचे मार्ग किती साधे आणी सोपे होते हे पाहून आजही मन आनंदाने भरून जाते. […]

गझल – प्रार्थना ही तिला भावली शेवटी

गझल वृत्त :- स्त्रग्विनी *लगावली* :- गालगा गालगा गालगा गालगा प्रार्थना ही तिला,भावली शेवटी साथ देण्यास ती,धावली शेवटी पोसली मी जिला रक्त पाजून ती; नागिणी सारखी,चावली शेवटी शोधली मी दया गावखेड्यात पण माझिया अंतरी , घावली शेवटी कोण येणार अंती बरे सोबती साथ येणार ती,सावली शेवटी सोडली साथ मी,काल तीची जरी हाक देताक्षणी पावली शेवटी © […]

बाळक्रीडा अभंग क्र.२

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते. […]

लिलाव !

 ‘तुला पाच पैश्याची किंमत नाही ‘ हे वाक्य आयुष्यात कितीदा ऐकले असेल याची नोंद नाही. घरी, बाहेर ,लहान.,थोर सर्वांची या बाबतीत एकवाक्यता मला आश्चर्यचकित करून जाते. जगणे कठीण झाले .म्हणून मग मी काय केले ?…… जगण्यासाठी एकदा मी माझाच लिलाव माडला, सर्व अवयव विक्रीस ठेवले , रास्त किंमत ,भव्य डिस्कांउट, एकावर एक फ्रीचे बॅनर लावले आमची […]

आध्यात्माची आवश्यकता

आध्यात्म म्हणजे आत्म्याची स्थिरता होय. जोपर्यत आत्मा स्थिर होत नाही, तोपर्यत कितीही पैसा, ऐषोराम, नोकर -चाकर सुख देवू शकत नाहीत. हे सुख फक्त आध्यात्मामुळेच मिळते. म्हणुनच ईश्वराचे नामस्मरण करणारा शेतकरी  दिवसभर काबाड कष्ट करूनही रात्री सुखाची झोप घेतो, तर पैसेवाला दिवसभर आरामात राहूनही रात्रीच्या रात्री जागून काढतो.  […]

अतिरेकी मेसेजेस

काही अतिरेकी भक्तलोक देव, देवी किंवा महाराजांचे उगाचच धमकीवाले मेसेज पाठवतात. नुसते पाठवत असतील पाठवू देत बिचारे! त्याचे काही नाही. पण त्यांनी पाठवलेल्या मेसेजची लिंक तोडायची नसते. मेसेज पुढे पाठवला नाही तर फार मोठे नुकसान होणार अशी वर धमकी असते. […]

1 87 88 89 90 91 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..