नवीन लेखन...

एका मनाचे हे भाग

एक विशाल मन,  भाग त्याचे अनेक विखूरले जावूनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक…१, छोट्या त्या भागावरी,  वेष्टण शरिराचे अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे…२, मनाचे ते स्वभाव,  सारखेच असती फरक वृत्तीमध्ये,  कुणाच्याही नसती…३, अगणीत ती मनें, कोठे नसे फरक अनेक ती बनली, जनक तिचा एक….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

आधार

वेलींना तो आधार होता,  वृक्ष वाटला दणकट परि बुंधा ज्याचा किडूनी गेला,  कोसळणार मग कधीतरी नष्ट करिल तो तरूवेलींना,  धरणीवरती आडवा होता सौंदर्य दिले लताफूलांनी,  सारे कांहीं विसरूनी जाता वेलींनो आणि झुडपानों,   सोडूनी घ्या तो आधार पोकळ स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या ,  स्वावलंबनाचे टाका पाऊल डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक

हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक यांचा जन्म २० डिसेंबर १९७७ रोजी झाला. आदित्य ओक हे वादन क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव. हार्मोनिअम, ऑर्गन वादनात यांचा हातखंडा आहे. अनेक सिनेमांचं संगीत संयोजनही त्यांनी केलं आहे. खूप लहान वयात पं. गोविंदराव पटवर्धन या हार्मोनिअम वादन क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीकडून शिकण्याचं भाग्य ओक यांना लाभलं. आदित्य ओक यांचे वडिल डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. […]

स्पॅम फोन कॉलमध्ये भारताचा जगात दुसरा नंबर

स्पॅम फोन कॉल अर्थात अनावश्यकपणे येणार्‍या फोन कॉलची  संख्या भारतात एवढी मोठी आहे की भारताचा जगात चक्क दुसरा नंबर लागतो. ही माहिती दिली आहे आपल्याला येणाऱ्या फोनचा नंबर तात्काळ मोबाइल स्क्रीन वर दाखवणाऱ्या ट्रुकॉलर (Truecaller) या ॲपच्या निर्मात्यांनी. […]

अंदमान समुद्रातील आव्हाने व त्यास भारताचे प्रत्युत्तर

आत्तापर्यंत आपण हिंदी महासागरावरच लक्ष केंद्रित करत होतो; पण अमेरिकेने पॅसिफिक महासागरातून आपले अस्तित्व कमी करायला सुरुवात केली, तेव्हापासून हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक महासागर दोन्हींकडे भारताने लक्ष देण्यास सुरुवात केली. हे सर्व महासागर दूर अंतरावर आहेत; मात्र आपल्या दोन्ही बाजूंना असलेल्या अरबी समुद्राचे आणि पूर्व किनार्यावरील अंदमान समुद्राचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. अंदमान समुद्र हा म्यानमार, दक्षिणपूर्व आशिया आणि भारत यामध्ये आहे. यापुढे तो हिंदी महासागराला मिळतो. त्या जवळच मलाक्काची सामुद्रधुनी आहे. […]

मराठमोळा मोहक चेहरा – स्पृहा जोशी

स्पृहा जितकी परखड आहे तितकीच मदत करणारीसुद्धा! एका व्यावसायिक शूटच्या वेळी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन स्पृहाला चक्क दहा वेगवेगळे पेहराव करावे लागले होते, ते तिने कोणतीही तक्रार न करता केले. हिंदुस्थानी सणांवर हे शूट बेतलं होतं. वेगवेगळे हिंदुस्थानी सण आणि एकच चेहरा अशी थीम होती. कल्पना सुरेख असली तरीही ती तडीस नेणं हे तसं कठीण होतं. आपल्या चेहऱयावर एकाच दिवशी दहा प्रयोग होणार होते. त्यातून आपली वेगळी प्रतिमा जगासमोर येणार होती. या सर्वांचा अभ्यास करूनच स्पृहाने या शूटला होकार दिला असावा. […]

फरिश्ता !

रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें. […]

डोळ्यांआड

सांगते जरा ऐका, नका दाखवू हे रूप, माणूसच खातो चाखून माखून, मेल्या मड्यावरचं तूप !! हाड् म्हटलं की, कुत्रा तरी निघून जातो, माणूस मात्र कुत्रं बनून, शेपूट हलवित राहतो!!१!! सांगते जरा ऐका, नका……!! तुझं तू माझं मी, असं फक्तं मुखाने बोलतो, डोळ्यांआड दुसऱ्या ताटात जिभाळ गाळीत डोकावतो!!२!! सांगते जरा ऐका, नका……!! परके आले पुढ्यात, तत्त्व प्रदर्शन […]

ती आल्यावर

ती आल्यावर बाग बहरली ,घेत उखाणे ती आल्यावर सुरू जाहले ,नवे तराणे ती आल्यावर मीच टाळतो,पितही नाही,पाजत नाही सरले सारे ,जुने बहाणे ती आल्यावर मुलगा गेला हातामधुनी माय सांगते चालू झाले हे गाऱ्हाणे ती आल्यावर पदरी पडले रत्न देखणे तिच्या सारखे घरही झाले असे शहाणे,ती आल्यावर किती जाळले सूर्याने मज ती नसताना नभात जमले मेघ दिवाणे […]

सकाळ

कुणी उधळला क्षीतिजावरती रंग केशरी हा सांगा मळवट भरल्या उंच टेकडया कुठे निघाल्या पर्वत रांगा भिरभिरणारे पंख चिमुकले का उधळले चौखूर कुशीत घेऊन आभाळ सारे पक्षी उडाले दूर दूर झाडे वेली होऊनी जागी फुले कुणाला वाहतात हिरवी हिरवी तृणपाती अजूनी दवाने नाहतात उंचावूनी मान आपुली माड शोधतो कोणाला सोवळे नेसून पळस वेचतो पाने आपुली द्रोणाला कुणी […]

1 7 8 9 10 11 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..