नवीन लेखन...

सत्कारणी वेळ

करू नकोस विचार त्याचा,  करणे नाही जेंव्हां तुजला मोलाचे हे जीवन असता,  व्यर्थ दवडशी वेळ कशाला….१ दोन घडीचे जीवन सारे,  क्षणा क्षणाने जाईल निघूनी कुणासाठी हा काळ थांबला,  उत्तर याचे घे तू शोधूनी….२ लहरी उठतील विचारांच्या,  आघात होता जेंव्हां मनी विवेक बुद्धीने शांत करावी,  भाव तरंगे त्याच क्षणी….३ मर्यादेचे आयुष्य असता,  वाहू नकोस विचार प्रवाही भगवंताचे […]

देशाटन ते पर्यटन; माझ्या नजरेतून

एकूणात गांव किंवा तिर्थयात्रा या पलिकडे त्या काळात देशाटन नव्हतं..परदेश तर खुप दुरची गोष्ट होती, आपला प्रान्त, आपला देश बघावा असंही काही फार जणांना वाटत नव्हतं. मुळात त्यावेळच्या बहुतेकांचं जग सिमित होतं. उत्पन्न मर्यादीत. एक जण कमावणार आणि दहा जण खाणार. महत्वाकांक्षाही सिमित, म्हणजे देन वेळचं जेवण, सणासुदीला एखादं लुगडं-कापड आणि मुलांची व गांवावरुन शिकण्यासाठी आलेल्यांचं शिक्षण, एवढीच. […]

जगाचा निरोप

काळ येतां वृद्धपणाचा,  विरक्तींची येई भावना निरोप घेण्या जगताचा,  तयार करीत असे मना वेड्यापरी आकर्षण होते,  सर्व जगातील वस्तूंवरी नाशवंत त्या, माहित असूनी,  प्रेम करितो जीवन भरी जीवनांतील ढळत्या वेळीं,  जेव्हां वळूनी बघतो मागें मृगजळासाठीं धावत होतो,  जाणून घेण्या सुखाची अंगे प्रयत्न केले जरी बहूत,   हातीं न लागे काहीं पूर्ण कल्पना येई मनीं,   जगण्यात आंता तथ्य […]

कोडग्यांचा हरवलेला इतिहास आणि भयाण भविष्यकाळ

खाजगी बिल्डर्स असोत, की ‘कल्याणकारी राज्य’ असं बिरुद स्वत:च्या नांवामागे किंवा नांवापुढे मिरवणारी सरकारी यंत्रणा असो किंवा ‘मुंबय नाय कुणाच्या बापाची’ म्हणत घोषणा ठोकणारे आणि स्वत:ला या मुंबईचे भुमीपुत्र म्हणवणारे आपण सर्व जण असोत, कुणाचंही अर्वाचिन मुंबई शहर आणि त्याच्या प्राचीन इतिहासाशी काहीही देणं घेणं उरलेलं नाही, हे एव्हाना सिद्ध झालंय. कुणाचंच कुणावर नियंत्रण नाही..!! […]

आठवण

अनामिक जे होते पूर्वी,  साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ येतां क्षणी,  हृदये त्यांची जूळूनी गेली  ।। शंका भीती आणि तगमग,  असंख्य भाव उमटती मनी  । विजयी झाले ऋणाणू बंध,  बांधले होते हृदयानी  ।। उचंबळूनी दाटूनी आला,  हृदयामधला ओलावा  । स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा  ।। मनी वसविल्या घर करूनी,  क्षणीक सुखांच्या आठवणी  […]

मिष्किल तारे

चमकत होते अगणित तारे, आकाशी लुकलुकणारे लक्ष्य वेधूनी घेतां घेतां,  फसवित होते आम्हांस सारे….१ कधी जाती चटकन मिटूनी,  केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी….२ एक एक जमती नभांगी,  धरणीवरल्या मांडवी अंगीं संख्या त्यांची वाढतां वाढतां,  दिसून येती अनेक रांगी….३ हसतो कुणीतरी मिश्कील तारा,  डोळे मिटतो दुजा बिचारा स्थिर राहूनी लपतां […]

मुंबैच्या टॅक्सीला लागलेल्या हळदीची गोष्ट

मुंबयची काली-पिली म्हंजे, मुंबयची काळी-पिवळी टॅक्सी. मी पाहिली ती देखणी, आटोपशीर, बांधेसूद फ्याट (‘फियाट’) गाडी. ॲंबेसिडर टॅक्सी मुबईत क्वचितच दिसायची आणि तिच्यावर ‘मोठी टॅक्सी’ असं ठसठशीतपणे लिहिलेलं असायचं. टॅक्सी असो कोणतीही, पण त्या काळात ड्रायव्हर असायचा तो सरदारजीच..! त्या काळात टॅक्सी म्हणजे काय तरी अप्रुपच वाटायचं. खाजगी गाड्या तर अगदी दुर्मिळ. टॅक्सीत बसणं म्हणजे स्वर्गप्राप्ती झाल्यासारखंच वाटायचं. […]

सखू ग सखू

सखू ग सखू, कुठं चाललीस? बाजारात जाते, बाजारहाट करते भाजीपाला आणते,फळबिळं आणते अंगडे टोपडे बघते,बाळा खाऊ घेते सखू ग सखू, कुठं चाललीस? पाचदहा रूपये घेते, दुकानात जाते गंध पावडर आणते,फणीबिनी बघते साबणतेल आणते,बाळा न्हाऊ घालते सखू ग सखू, कुठं चाललीस ? दवाखान्यात जाते,डाक्तरला दावते दवापाणी घेते, डिकमली बघते गुट्टीबिट्टी लावते,बाळाला लई जपते सखू ग सखू, कुठं […]

शासकीय भाषा आणि ( अनेकदा गैरही ) अर्थ !

शासन व्यवहारात मराठी भाषेच्या सक्तीच्या वापरासंबंधी मध्यंतरी बातम्या प्रकाशित झाल्या. यात खरं नेमकं काय आहे ? आदेश म्हणजे order , परिपत्रक म्हणजे circular , ताकीद म्हणजे warning , शासन निर्णय म्हणजे Government order ( प्रत्यक्षात तो शब्द हवा Government Resolution किंवा Administrative Order ) …आणि या प्रत्येकाचे अर्थ वेगळे आहेत शिवाय त्या प्रत्येक शब्दाला वैधानिक मूल्य आहे आणि अंमलबजावणीच्या ‘तर्‍हा’ही वेगळ्या आहेत हे माहिती असल्यानं संभ्रमच निर्माण झालं . […]

1 96 97 98 99 100 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..