तेजोनिधीच्या आगमनाने
तेजोनिधीच्या आगमनाने, निळ्या आभाळां सोनझळाळी, जलद अवतरती सोनेरी किती,—- डोकावती विस्तीर्ण जलाशयी,— आपुला रंग लेऊनी पाणी,—– कसे खळाळते समुद्री,खाली, अस्तित्व” अमुचे दाखवतो त्यांना, प्रतिबिंबित होऊनी समुद्रकिनारी,– निळा जलाशय तो हसे गाली, कुठून आली माझ्यावर “निळाई”, वर्षा ऋतूत जेव्हा ‘बरसला’ तुम्ही, तुमच्यातील पाणीच आले खाली, निळे–शाssर रंगले माझे पाणी, किनार्यावर लोक हिंडून बघती, जलभरले’ “मेघ” कुठे असती,– उत्सुकताही […]