कुठून आलो, कुठे निघालो
कुठून आलो, कुठे निघालो,– कळिकाळाचे पांथस्थ,– मार्ग दिसो न उमजो, राहावे लागे तटस्थ,–!!! जन्मप्रसंगी बाळाच्या, आईला होती प्रसववेदना, कोणास ठाऊक म्हणे त्या, कोणाच्यातरी मरणयातना,—!!! सुखाच्या लागता मागे, मोहमयी खेळ चाले, ठरती बघतां बघतां ते, मायेचे किमयागार सारे,—!!! आभास दिसती सुखाचे, जो तो त्यासाठी तडफडे, हव्यास ठेवून असे, पदरात शेवटी काय पडे,—!!! सौंदर्य पाहुनी वरवरचे, जो तो […]