तूच माझा चंद्र
तूच माझा चंद्र, अन् तूच चांदण्यांची संगत, तुझ्याशिवाय प्रीतीला रे, येईल का पुन्हा रंगत, रात्र आहे चमचमती, हवेत सुटला गारवा ,— तुझ्यावाचून फुलत नाही, येथील रातराणीचा ताटवा, रात्र असे देखणी,– हर एक चांदणी भाळते, निकट जाण्या चंद्राच्या, त्यांच्यातच होड लागते, इथे धरेवर मी, तुझ्यासाठी तरसते, तुझ्या नावाचा चंद्र , माझ्या भाळी रेखिते, विरहार्त समुद्री,अशा सदैव माझे […]