चला, आठवणींच्या गावा जाऊ
चला, आठवणींच्या गावा जाऊ, स्मृतींचे हिंदोळे झुलवत पुन्हा एकदा लहान होऊ, हाती हात मिळवत,–!!! आठवांचे गावच रमणीय,—!!!! किती नांदती सगेसोयरे, हासुन आपले स्वागत करती, त्यात बालपणीचे वडीलधारे,–!!! शाळेतील शिक्षकांच्या हाती, मुळीच लागायचे नाही, त्यांनी केलेल्या कठोर शिक्षा, काहीच आठवायचे नाही, आठवावा तो निरागसपणा, निष्पाप कोवळे ते वय , अशावेळी हमखास येते, मैत्रिणींची खूप सय, कधी लुटूपुटूची […]