आकाश
इतकं सारं विस्तीर्ण अवकाश असताना गरीबांच्या घरीच तेवढं छपरातून का डोकावून पाहावं आकाशानं ? — श्रीकांत पेटकर
इतकं सारं विस्तीर्ण अवकाश असताना गरीबांच्या घरीच तेवढं छपरातून का डोकावून पाहावं आकाशानं ? — श्रीकांत पेटकर
थोडा रिकामा दिसलो रे दिसलो की एखादा शब्द येतो कुठूनतरी त्याला थोडं गुणगुणलं कि अजून दुसरा मग तिसरा असे येत राहतात फेर धरतात मी सुद्धा जास्त विचार करत नाही शब्दांना येऊ देतो मग लिहून घेतो मला बरं वाटते …छान वाटते ते काही म्हणत नाही अन मीही काही म्हणत नाही हे सारं कविता आहे की अजून दुसरं […]
सतत गुंतलो आहो सारे शोध घेण्यास त्या ‘आनंदाला’ युगानूयुगे प्रयत्न होतो मिळवण्यासाठींच प्रभूला…१ बाह्य जगाचे सुख आगळे लागले सारे त्याच्या पाठीं ‘देह सुख’ अंतीम वाटे, खरा ‘आनंद’ देण्यापोटी…२ ‘ज्ञानामध्ये’ भरला ‘आनंद’ समजूत झाली ही कांहींना लेखक, कवी, साहीत्यिक हे पाठ त्याची कांहीं सोडीना…३, साधू संत हे थोर महात्मे आनंद शोधूती ‘विश्रमांत’ ‘ध्यान’ लावून एक मनानें शांत […]
लहानपणा पासून मी कमी बोलणारा आणि एक्कलकोंडा आहे. लोक माझी खिल्ली उडवतात मला पाहून खिदी -खिदी हसतात. मला वाईट वाटत. मग मी त्यांच्या पासून दूरच रहातो. माझ्या अश्या वागण्याने घरचे लोक मला ‘घुम्या’ म्हणू लागले , मग बाहेरचे पण याच नावाने बोलावू लागले! आज माझी हीच ओळख आहे. घुम्या !! […]
असे कसे प्रकट होतात काही संतजन ज्यांना नसतात मायबाप नसते जन्मतारीखही प्रकटू देत त्यांचे त्यांना भेटू देत त्यांना भक्तही बापुडे हजारोंनी मला काय त्याचे…. पण म्हणतो देशासाठी देशाच्या सिमेवरही प्रकट व्हा हो संतानो असेच युध्दाचे वेळी हजारो संख्येनी !
काही राजकीय पक्ष व नेते दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी रात्री १२ वाजता सुप्रिम कोर्टाचा दरवाजा ठोठतात. आज अनेक सैनिकांविरुद्ध खोटे-नाटे खटले कोर्टात चालू आहेत. पण देशातील राजकीय पक्षांचे हुशार वकील त्यांना मदत करण्यास का पुढे येत नाहीत? सैन्यावर होणार्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी, सैन्याची बदनामी करणारे व्हिडिओ पसरवणार्यांवर कारवाई होण्यासाठी राजकीय पक्ष एकत्र का येत नाहीत? […]
संदर्भ – विविध टी. व्ही. चॅनलवरील बातम्या, भारताचा POK मधील तीन दहशतवादी कँपस् वर यशस्वी हवाई हल्ला […]
विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं. १६ डिसेंबर १९७२ रोजी पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला. […]
शरीरातील आम्लाचा प्रभाव कमी करण्यासाठी दिवसभरात चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करून जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर देणे, शरीरासाठी केव्हाही उपयुक्त ठरते. दिवसभरात कुठलेही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा पाणी पिण्यावर आपण भर देणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होईल. […]
घर -दार ऑफिस- बिफीस पोरं-सोरं लोकल -बिकल रीक्षा -बिक्षा रोज दिवसभर जा- ये पुन्हा तसंच ये -जा लोकल- बिकल परत -फिरत घर -बार जेवण- खावण जीवन -बिवन चालत राहतं वेळ कुठे कविते-बिवितेसाठी? ती तर सतत–सोबत पाठी- पाठी मुखी -ओठी/// # कौशल श्रीकांत पेटकर ९७६९२१३९१३
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions