महात्मा गांधी यांना अनावृत्त पत्र
आदरणीय महात्माजी, विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ जगतवंद्य विभूती आपणांस मानले जाते. विलक्षण निर्भयता, नम्रता, कमालीची साधी राहणी, दीन-दलितांविषयी अथांग करुणा आणि शोषितांबद्दल सहानुभूती या गुणांचा संगम आपल्या ठिकाणी होता. तत्वज्ञान ही जीवनाबरोबर विकसीत होणारी गोष्ट आहे, हे आपल्या बाबतीत खरे आहे. नैतिकता हेच संस्कृतीचे अधिष्ठान, संयम व त्याग हाच तिचा आत्मा. सुखोपयोगी साधने वाढविण्याची संस्कृती सध्या निर्माण होत आहे. श्रमप्रतिष्ठेची पीछेहाट होत आहे. […]