February 2019
जन्मापूर्वी चाऱ्याची योजना
योजना करी चाऱ्याची, मुख देण्याचे आधी, तुझ्या दयेची किमया, कळली न कुणा कधीं….१, बदल करूनी शरिरी, मातृत्वाचे भरतो रंग, क्षिराचा देई साठा, पुलकित करूनी अंग…२, सदैव तयार राहूनी, दाना देई भूमाता, कुणी न उपाशी राही, काळजी घेई विधाता….३, जन्म देवूनी साऱ्यांना, पोषण तोच करितो अनंत उपकार करूनी, ऋणी आम्हा ठेवतो…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
बघते नुसती हसते नुसती
बघते नुसती हसते नुसती फसवत फसवत फसते नुसती ! लाडिक चालणं लाडिक बोलणं खुळ ही लावत असते नुसती ! बंदच डोळे उघडे डोळे डोळ्यापूढे दिसते नुसती ! सुचवत काही सांगत काही काव्यातहि असते नुसती ! असते छानच नसतानाही विचारातच असते नुसती ! — श्रीकांत पेटकर
मराठी लोकांनी खेकड्याची वृत्ती सोडावी ……..!
पानिपत चा आणि १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातला पराजय हा शेवटला ठरला पाहिजे .आता देशाची सूत्र महाराष्ट्राच्या हाती देवून तर पहा .न भूतो न भविष्यती अशी प्रगती हा महाराष्ट्र देशा साठी घडवून आणेल. […]
अखेरचे येवून जा एकदा
निरोप मिळता कुठुन दुरुन धावत ये एकदा गर्दी जमेल पण गर्दीत मिसळून घे एकदा / तयारी सुरु असेल शोकाकुल अंतिम यात्रेची रडतील जीवलग त्यात मिसळ रडणे तुझे एकदा ! कुसकट नजरा तुझ्याकडे वळतील वारंवार दुर्लक्ष तिकडे करुनी शोक कर जाहीर एकदा ! अनेक असतील तरीही बिनधास्त रडुन घे तू बोलणे होणारच नाही, पण पाहुन घे मला एकदा! झोपलो चितेवर दुरुनच चोरुन पाहुन घे जातील सगळे ,थांबुन घे माझेसाठी जरा एकदा ! शेवटीचे भेट म्हणूनी काय द्यावे समजेना मला मुठभर राख ऊचलूनी घे, तीच आठवण एकदा! जा आता वेळ झाला ,किती थांबशील वेडे मलाही वाटेल उठुन सावरावे, अखेरचे एकदा! — श्रीकांत पेटकर
लढाईस लागा
जवळ वेळ आली ……तयारीस लागा जवळ वेळ आली ……विलासास त्यागा/ फितूर दिसती येथले लोक छूपे जवळ वेळ आली…… लढाईस जागा / कल्लोळ कसला अन चर्चा या कशाला जवळ वेळ आली…… शहाणेच वागा / बंधुत्वाचं खूपच फसवं नातं चाले जवळ वेळ आली….. तपासाच धागा / निर्णयात क्षण दवळावा कशाला जवळ वेळ आली…. कशालाच त्रागा / @कौशल(श्रीकांत पेटकर ) २२/ […]
‘अँटी-नॅशनल’ वरुन पत्रकारांच्या आक्रस्ताळेपणाचा कहर..
खरा प्रश्न आहे तो, सचिन व सुनील यांच्या स्टेटमेंटस् च्या योग्यायोग्यतेचा. परंतु, पत्रकार ( किंवा, भूतपूर्व पत्रकार) आशुतोष यानें विनाकरण त्याला वेगळाच रंग देऊन आक्रस्ताळेपणा केला. तसा तो आक्रस्ताळाच आहे. पत्रकार म्हणून तो एका टी.व्ही. चॅनेलशी संबंधित होता, आणि मुलाखती घेत असे, तेव्हांही त्याची पत्रकारिता आक्रस्ताळीच होती . नंतर आम आदमी पार्टीचा स्पोक्समन म्हणून तो मुलाखती देत असे, तेव्हांही तो आक्रस्ताळाच होता. त्यामुळे कालच्या चर्चेत तो एक सहभागी पाहुणा म्हणून आक्रस्ताळेपणानें बोलला तर त्याचें नवल वाटायला नको. […]
सूड वलय
उत्साहाने आला होता, मुंबई बघण्याकरिता रम्य स्थळांना भेट देणे, ही योजना मनी आखता मान्य नव्हती त्याची योजना, नियतीच्या चाकोरीला पाकीट पळवूनी त्याचे, घाला कुणीतरी घातला, धन जाता हाता मधले, योजना ती बारगळली अवचित त्या घटनेने, निराशा तेथे पसरली, जात असता सरळ मार्गी, दुष्टपणाला बळी गेला समाजाला धडा शिकवण्या, सूडाने तो पेटून गेला, वाम मार्गी जावून त्याने, […]
शामल शामल संध्याकाळी
शामल शामल संध्याकाळी, पुन्हा सगळे गुंतवीत धागे, प्रीत जडे कशी अनुरागी, जसे घडले तेव्हा मागे, –!!! एकमेका अनुरक्त होता, जीव थोडाथोडा होई, प्रीत जुळता रेशमी ती, परत एकदा भेटू दोघे,–!!! पापण्यांची थरथर अगदी, तारुण्य किती अलवार, सावल्यांच्या साक्षीने तो, मिलाफही सुकुमार, –!!! हात गुंफता हातामध्ये, मजेची ती सफर करू, प्रेम प्रीती कोमलांगी, हळूच कशी उरी धरू,–!!! […]
गुरुबोध मात्र विसरू नकोस….
रोज थोडे तरी कार्य केल्यावाचून राहू नकोस, ब्रह्यांडनायक पहातायेत तुला गुरूबोध मात्र विसरु नकोस…. तुझ्या वाटेत आडवे खूप येतीलही… पायात पाय घालून पाडवतीलही…. घाबरून त्यांना तू तुझं उभे राहणं सोडू नकोस.. सद्गुरू पहातायेत तुला गुरूबोध मात्र विसरू नकोस तुझं कौतुक प्रत्येकाला इथं रुचेलच असं नाही… कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असंही नाही… तू मात्र इतरांचं कौतुक करण्यास […]