शेवटचा राजयोगी गेला..
तसं पाहायला गेलं तर, मनोहर पर्रीकर काही राष्ट्रीय राजकारणात नव्हते. केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी पार पाडलेली अल्पकाळाची जबाबदारी वगळता, त्यांची संपूर्ण कारकीर्द गोव्यापुरतीच मर्यादीत होती. लोकसभेच्या अवघ्या दोन जागा असलेलं, गोवा देशातील सर्वाच लहान राज्य. असं असुनही या लहानश्या राज्यातलं एक व्यक्तिमत्व अखील भारतीय का होतं, त्यांच्या जाण्याने अख्खा देश का हळहळतो, असं काय वेगळेपण होतं या माणसात, याचा विचार करता, हाती लागतं ते एक कारण आणि ते म्हणजे त्यांचा साधेपणा आणि रोजच्या जगण्यातला सहजपणा. […]