नवीन लेखन...

सकारात्मक दृष्टीकोन

जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो. जेव्हा आपण सकारात्मक लहरी आपल्या जीवनात निर्माण करतो तेव्हा आपण सकारात्मक घटना आपल्या आयुष्यात आकर्षित करतो आणि त्याचा आपल्या ध्येयाप्रती उपयोग होतो. […]

मुलीच्या कविता

बालपणात एकत्र खेळतात सगळे मुलंमुली वय वाढत जाते भवतालचं मुलीचं वय जरा लवकरच वाढत असते . ‘आता तू मोठी झालीस ‘ ऐकू येते वेळीच एकत्र खेळणं थांबवावं …….असं वाटणं अनुभवाचं . कसं सांगावं वेगळे असतात आतून सगळे वेगळे असतात स्पर्श वेगळे असतात खेळ वेगळ्या असतात नजरा आणि मुलात माणूस अन माणसात नरपण , पशूपण वाढत असते […]

उतावीळ

अनुत्तरीत असंख्य प्रश्नांनी पोकळ मनाच्या भरगच्च ज्ञानानी उतावीळ उतावीळ मिळालेल्या अनुभवांनी … संघर्षाची नकोय शक्ती नाही गाठलेली कुणाची भक्ती उतावीळ उतावीळ तरीही येथे प्रत्येक व्यक्ती विलंबाकडे करुनी पाठ उद्द्येशाची लावूनी वाट उतावीळ उतावीळ त्रिशंकुंचा हा सारीपाट चाले तंद्री झपाझप बहिरा असावा जणू प्रत्येक हेरून संकटांची पोटली पुन्हा रस्ता त्याच चौकात… — सौ. देवयानी खरे 

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ४

मराठ्यांच्‍या अर्थकारणाचा विचार केल्‍याशिवाय तत्‍कालीन परिस्थितीचे पूर्ण आकलन होत नाही. मराठी माणूस पैशाच्‍या मागे लागत नाही, अर्थकारण करत नाही, असा एक समज हल्‍ली झालेला आहे. परंतु १८व्‍या शतकातील परिस्थिती वेगळी होती, हे सत्‍य आपण लक्षात घ्‍यायला हवे […]

माझा चड्डीयार (अनेक भागामध्ये )

सकाळचा अभ्यास करुन आम्ही दोघे रोज धावण्यासाठी व व्यायामासाठी बाहेर पडत असू. साधारण दोन एक मैल आम्ही धावत व्यायाम करावयाचा. रस्त्याने वा शाळेच्या मैदानावर चकरा मारायचे. एक गोष्ट गमतीची घडत असे. अचानक आठवली. शाळेच्या शेजारील शेतामध्ये, प्रासंगीक छोटी छोटी पिके लावली जात होती. त्यांत भुईमुगाच्या शेंगा, चवळी, टहाळ ( हरबरा ), मका, असायचे.  ही पिके येऊ […]

राम गणेश गडकरींचा समृद्ध वारसा – जुई गडकरी

आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी. मराठी साहित्य आणि नाटय़सृष्टीत मोलाचं योगदान केलेल्या राम गणेश गडकरींची ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही नाटकं, तर ‘वाग्वैजयंती’ हा काव्यसंग्रह आजही रसिकांवर गारुड घालत आहे. याच गडकरींचा मराठी धागा पुढे कायम राखत आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या […]

विचार आतला

विचार आतला, काळोख दाटला, घर उजळता, दिसे आत्मा,–!! चिंता, दु:खे, बोचरी सुखे , हृदयाला भिडती, विलक्षण खंता,–!!! मी– तू पणा गळतो, अंतरात्मा छळतो, मोक्ष मागतो, प्राणांतील परमात्मा,–!!! जीव सुटेना, कर्मात, भोगात, अडकून राहिला, दार उघडेना, मुक्काम बदलेना,–!!! नसते हातात, व्यथा हृदयात, जिवा छळतात, काळज्या बऱ्याचशा,–!!! स्वर्ग नरक, कल्पना नुसत्या, माणसांच्या वस्त्या, नकोशा, नकोशा,–!!!! हिमगौरी कर्वे

संघर्षातून समोपचारकडे !

राममंदिर प्रकरणी सुरु असलेल्या अनेक वर्षाच्या संघर्षाचा समारोप करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सामोपचाराचा मार्ग सुचविला आहे. परस्परांची सहमती असेल तर कोणताही मुद्दा सामोपचाराने मिटवला जाऊ शकतो. समंजसपणे तोडगा काढल्यास सामाजिक सलोखा कायम राखण्यासही मदतच होईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचे स्वागत करावे लागेल. अर्थात, राम मंदिर आणि बाबरी मशीद हा काहींसाठी राजकारणाचा मुद्दा बनेलला आहे. त्याचा असा ‘निकाल’ लागणे त्यांना कितपत रुचेल हा एक प्रश्नच आहे. […]

रात्र अजून भिजत होती !

…… तशा हि परिस्थितीत शशांकचे लक्ष गादीजवळच्या लाईटच्या पोलवरील ‘पोल क्रमांक १७’ने खेचून घेतले. जणू ‘आहे ना लक्षात हा क्रमांक?’ हाच प्रश्न तो हि शशांकला विचारत होता! जन्मजात एक पाय विकसित न झालेलं, दोन्ही डोळ्याच्या पापण्या नसलेलं कुरूप मुलं शशांक(आणि शिखातरी) कस सांभाळणार होता? म्हणून त्याने शिखास ‘मृत मुलं’ जन्मले म्हणून सांगितले होते. […]

आयुष्याचा निर्णय कुणाचा ?

आपलं आयुष्य कसं असावं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे विद्यार्थी आई वडिलांनी पसंतीचं करीयर करू दिलं नाही म्हणून आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडतात. तसंच घरच्यांचा विरोध असतांनाही व्यसनं करतात, आपल्याच पसंतीचा जोडीदार आणतात. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला जेथे सोईस्कर असते तिथे आपण आपले निर्णय घेतो आणि इतर ठिकाणी आपल्या त्रासाचा किंवा अपयशाचा दोष दुसऱ्यांना देतो. […]

1 13 14 15 16 17 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..