अॅडव्होकेटांची बासुंदी
वकिली सोडून देऊन अॅडव्होकेट चार दिवस सुन्न बसले होते. मग त्यांच्या डोक्यात मराठवाड्यात लग्नांच्या जेवणावळीत बर्यापैकी माहीत असलेली कानविंद्यांची बासुंदी चमकून गेली. तशी बासुंदी करून विकली तर? नक्कीच पुण्यात फेमस होईल! चितळेंच्या बाकरवडी सारखी! किंवा कयानीच्या श्रूजबेरी बिस्किटांसारखी! आणि अशा तर्हेनं अॅडव्होकेटांच्या बासुंदीचा उदय झाला होता. […]