कोण दिसे हा पाण्यामध्ये
कोण दिसे हा पाण्यामध्ये,असावा माझाच भाईबंद, चोच बांकदार, रूप देखणे, मनाने दिसतोय स्वच्छंद, गुबगुबीत पांढरी पाठ, कोरीव वर काळ्या रेघा, नजर शोधक पाण्यात, भक्ष्यच भागवेल भुका , सुळकन जो वर येईल, मटकावेन आधी त्याला,–!!! कळणारही नाही याला, कधी गिळले मी माशाला,-? डोळे तीक्ष्णमाझे, नजरही अगदी करडी, पाण्यातील या पक्ष्याची, मात्र भासे मज बेगडी,–!!!! हिमगौरी कर्वे.