नवीन लेखन...

या कातरल्या क्षणांना

या कातरल्या क्षणांना, सय तुझी येते,– उन्हाची तप्त काहिली, चटकन् दूर होते, वारा धुंद वाही, ढग जाती प्रवासी, अधूनमधून बिजलीही, उगा आपुले दर्शन देई, अशा वेळी आठवे मज, सोनेरी प्रभेची सांज, याच समुद्रकिनारी, वाजली मिलनाची गाज, नभ सुंदर सोनबावरे, होते भेटीस साक्षी, कूजन करीत बागडती, पक्षी आनंदें वृक्षी, किनारा दूरवर तटस्थ, उभ्याने राखी सागराला, मिलनाची किती […]

दुधामधील चंद्र

कोजागिरीची पौर्णिमा परि,  आकाश होते ढगाळलेले शोधूं लागले नयन आमचे,  चंद्र चांदणे कोठे लपले गाणी गावून नाचत होती,  गच्चीवरली मंडळी सारी आनंदाची नशा चढून मग,  तल्लीन झाली आपल्याच परी मध्यरात्र ती होवून गेली,  चंद्र न दिसे अजूनी कुणा, वायु नव्हता फिरत नभी तो,  मेघ राहती त्याच ठिकाणा दूध आटवूनी प्रसाद घेण्या,  उत्सुक होतो आम्ही सारे ढगात […]

शिवधनुष्य बोरघाटाचं

बोरघाट बांधणीचे हे अवघड बांधकाम ब्रिटिशांनी कर्जत, पळसदरी ते खंडाळा आणि लोणवली (लोणावळा) ते खंडाळा असे दोन्ही बाजूंनी सुरू केले होते. हा घाट बांधण्याचा खर्च दर मैला मागे ६,६४,३७५ रुपये इतका, तर एकूण खर्च १,०५,००,२६७ रुपये इतका झाला. एका रुपया मध्ये ३५ ते ४० किलो तांदूळ मिळण्याचा आणि कारकुनाचा पगार आठ ते दहा रुपये आणि अधिकाऱ्यांचा पगार वीस ते पंचवीस रुपये महिना असण्याच्या त्या काळात हे खर्चाचे आकडे छाती दडपून टाकणारे होते. […]

रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग

रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा उल्लेख आजपर्यंत फार कमी झाला. त्रिचूर वैद्यनाथन यांनी Working on SELF Realisation ह्या समूहावर एक लिंक सामायिक केली आहे. त्यातील कहाणीचे मराठी भाषांतर सादर करीत आहे. रामायणातील फारशी माहित नसलेली एक कथा […]

दु:खे आणि वेदना

दु:खे आणि वेदना, जीवना,तुझे दुसरे नाव, माणूस हरून जातो, जेव्हा घेतसे तुझा ठांव, आपुले परके होती, परके म्हणती आपुले, या सगळ्यात सारखे, भरडत जातो चांगले,–!!! जीव किती जखमी होतो, प्रेमाचा नसता लवलेश, मानसिक यातना भोगतो, अगणित असती क्लेश,–!!! दात आहेत, चणे नसती, चणे असती, दात नाहीत, अशांत कोण घांस घेई, कोण फडशा जातो पाडीत,–!!! विचारताना साधे […]

विलेक्शनचा फार्स

नाटकाचे अनेक प्रकार असतात. त्यातल्या ‘फार्स’ ह्या नाट्य प्रकारात, सध्याचं मुख्यतः द्विपात्री आणि द्विसंवादी निवडणुक नाट्य फिट्ट बसतं. या नाटकात मुख्य संवाद असे दोनच, ‘मै भी चौकीदार’ आणि ‘चौकीदार चोर है’ किंवा ‘चौकीदार चोर है’ आणि ‘मै भी चौकीदार’ हे, पण वेगवेगळ्या स्वरात आणि कधीकधी तारस्वरात म्हटलेले. […]

सुखाची मोहमाया

तप्त लोखंडात,  लपली ती आग दिसे लाल लाल,  जाळी सर्व भाग…१, सुंदर फूलात,  सुंगध तो छान अवती भवती काटे,  ते कठीण…२, विजेची ती तार,  प्रकाशी दिव्याला, झटका तो देई,  स्पर्श होता तिला..३, सुखाच्या पाठीशी, असे दुःख छाया न दिसे ती आम्हा,  असे मोह माया…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : प्रास्ताविक

प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या  ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट  प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.   […]

चीनच्या आर्थिक नाड्या आवळल्याच पाहिजेत

चिनी उत्पादनांवर बंदी घालून त्यांची आर्थिक कोंडी केली पाहिजे. फक्त इलेक्ट्रॉनिक्स नाही, तर खाण्या-पिण्यापासून ते आमच्या देवधर्मापर्यंत प्रत्येक गोष्टीत चीन घुसला आहे. या चीनचे हे मार्केट बंद करून, चिनी मालावर बंदी घालून चीनचे नाक कापून काढण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षात आम्ही इतके चीनमय झालो आहोत की घरात आमच्या फेंगशुई या चिनी वास्तुशास्त्राची घुसखोरी झाली. चिनी देव आमच्या घरात घुसले. लाफिंग बुद्धा, तीन पायांचा बेडूक, कासव, घंटा आणि बरेच काही. […]

दक्षिणेचे सुपरस्टार कमल हासन

दक्षिणेचे सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेले कमल हासन यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी `कलतूर कन्नम्मा’ या तमिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये त्यांनी ‘एक दुजे के लिए’ या सिनेमाद्वारे पदार्पण केले होते. कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. […]

1 6 7 8 9 10 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..