पाणबुडी ( submarine ) म्युझियम – भारतीय नौदलाचे गौरवस्थान
भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आंध्र राज्यातील विशाखापटटम ( वैझ्याग ) हे पुरातन काळापासूनचे महत्वाचे बंदर. ब्रिटीश राज्यकर्त्यानी मोठी गोदी बांधून समुद्र व्यापार मार्गाचे महत्वाचे ठिकाण तयार केले. आज भारतीय नौदलात त्याचे अनन्य साधारण महत्व असून सबमरीन्सचा महत्वाचा बेस येथे आहे. विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीच वरील सबमरीन म्युझियम पाहून डोळ्याचे पारणे फिटले. प्रत्येक भारतीय नागरीकाने त्याला भेट देऊन मानाचा मुजरा दिलाच पाहिजे अशी ही विशेष जागा आहे. आशिया खंडातील अशा तऱ्हेचे हे एकमेव म्युझियम आहे. […]