तू असा वाहता की
तू असा वाहता की,खळाळते पाणी, जसा सागर उचंबळे, गात जीवनगाणी,–!!! तू असा निश्चल की, जसा असतो पहाड, किती स्थितप्रज्ञ राही, वाऱ्या वादळी अटल–.!!! तू असा ढगांसारखा, अविरत ना चंचल, संजीवन बरसले तरी, शांत गंभीर अटळ,–!!! तू असा किनाऱ्यासम, भाससी किती तटस्थ, लाटा सुखदुःखांच्या उफाळती तरीही अतिशय अचल,–!!! तू असा हिंडता की, वाऱ्याशी तुझी जोडी, अखंड वाहशी […]