धागा धागा मिळून
धागा धागा मिळून,बांधले,खास घरटे, फांदीचा आधार घेऊन, उभ्या झाडास लटकवले, एक चोंच करी किमया, केवढी मोठी कारागिरी, पिल्लांस सुरक्षित करण्यां, माय बापाची चाले हेरगिरी, घर मोठे प्रशस्त हवेशीर, वारा चारी बाजूंनी वाहे, निसर्ग सान्निध्यातले, वाटते मोठे आरामशीर, अंडी घालून ती उबवती, वाट जन्माची पाहती, कारागीरच ते नव्या उमेदी, दार घरट्याचे असे बांधले, सहजी कोणी उतरू नये, […]