नवीन लेखन...

विश्वची विश्व पहा जगती अन धावती

बी रुजते, वाढते, त्याचे रोपटे होते, रोपट्याचा वटवृक्ष होतो. बी ला माहिती नसते तिच्या आत दडलेल्या वटवृक्षाच्या अस्तित्वाची. तिची सृष्टी वेगळी असते. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजीवाची सृष्टी वेगळी, त्याची रचना वेगळी. मानवी विश्वात प्रत्येक माणुस स्वत:ची वेगळी सृष्टी बाळगुन असतो. आपल्याच विश्वात रममाण झालेला. त्याची दु:खे, त्याचे सुख याचे कारण आणि निराकारण तोच करू शकतो. जसा […]

आज मन आनंदले

आज मन आनंदले, सुखाच्याही पा–र गेले, भंवसागरी तरणे खासे, आता सोपे वाटले,–!!! दुनियादारी निभावणे, असते किती कठीण, तरीही तावून-सुलाखणे, सहजी कसे जमले,–!!! मनमोर थुई थुई नाचे, पदन्यासाची तऱ्हा वेगळी, डोळ्यातून दोन थेंब सुखाचे समस्यांची असून चलती,–! खंबीर,धीरगंभीर राहणे, तटस्थभूमिका निभावावी, येऊ देत वारे–वादळे, मात्र एक झुंज द्यावी,–! तुझ्यापेक्षा मी सरस, म्हणत त्यांन भिडावे, संकटांचे सतत घोर, […]

किती चाले गडबड ही

किती चाले गडबड ही,कोण वरे कोणाला, वारा वाहे दाही दिशा, आभाळ पाहे धरणीला,–!!! झुळुक झुरे वाऱ्यासाठी, वारा वरतो हवेला, थंडी तडफडे उन्हाकरता , उन मात्र सावलीसाठी,–!!! रोप तरसते मातीला, माती जीवनासाठी तरसे , जीवन तडफडे ढगांसाठी, ढग आकर्षित विजेने,–!!! वीज आभाळा शोधे, आभाळ डोळे क्षितिजा लावे, क्षितिज उत्कंठित पहाटेसाठी, पहाट तळमळे सूर्यामात्रे,–!!! सूर्य पाहे वाकून वाट, […]

ऊर्जेचा करा योग्य उपयोग

खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरिता   ।।धृ।। बागेतील फुले सुंदर फुलपाखरांचे रंग बहारदार मोहक इंद्र धनुष्याकार निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता   ।।१।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता भजन पुजन प्रभूचे भक्ति-भाव मनाचे उपवास करी देहशुद्धीचे तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता   ।।२।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता गरिबासी मदतीचा […]

मुलं आणि फुलं

नाजूक, निर्लेप आणि निखळता ज्यांच्यात आहे अशी फुलं आणि हेवा, दावा, व्देष यापैंकी कोणताही रंग ज्यांच्यावर चढलेला नाही अशी मुलं. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू…! कशा..! फुलं उमलतं, बहरतं आणि सुगंधतं. त्याच्या उमलणं स्वाभाविक असतं. आतून आलेलं असतं. कुणी त्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही, म्हणूनच ते प्रभावी असतं, परिणामकारक, आपलं करणारं असतं. मुलंही अशीच असतात. स्वच्छ […]

माझे प्रजासत्ताक

वर्ग भरला होता, गुरूजी मुलांना काहीतरी समजावत होते. वातावरण हलकं-फुलकं होतं. दोन दिवसावर प्रजासत्ताक दिन आला होता. त्यामुळे देशासाठी बलीदान देणाऱ्यांच्या गोष्टी गुरूजी मुलांना सांगत होते. मध्येच एका मुलाने ‘प्रजासत्ताक म्हणजे काय?’ असा प्रश्न गुरूजींना विचारला… गुरूजी हसले म्हणाले, ‘सोपं आहे, ज्या ठिकाणी प्रजेचं म्हणजे लोकांचं राज्य आहे, सत्ता आहे ते म्हणजे प्रजासत्ताक’ गुरूजींनी सोप्या शब्दात […]

कुठे नाही स्वरूप देवा

कुठे नाही स्वरूप देवा, बघायला मिळत आम्हा, काळीज नमते तुज पाहता, चराचरातील या घटका, — निसर्ग मज वाटतो, तुझेच रुप देवा, तिथेच आम्ही तुला मानतो, स्वरूप कोणते का असे बा, ना तू कुठल्या देवळा, ना कुठल्या मंदिरी, प्रत्येकाच्या हृदयी बसशी,असशी तू हरी,—- प्रेम, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा, कुठे तू नसशी फक्त सांग मज गा ,—!!!! माणुसकी […]

गोष्ट आठवणीतली..

ही गोष्ट मी लहानपणी वाचली होती. रेळे गुरुजींच्या २४ पानी गोष्टीच्या पुस्तकात. अंधुकशी आठवत होती. तिचा शेवट मात्र लख्ख आठवत होता. हलकीशी आठवणारी गोष्ट थोडी फुलवून लिहिलीय. तात्पर्य मात्र तेच ठेवलंय. ही पोस्ट राजकीय नाही. कुणाला ती राजकीय वाटल्यास आणि या गोष्टीतून कुणी काही अर्थ काढलाच, तर ती जबाबदारी माझी नाही..!! […]

घनदाट त्या वृक्षाखाली

घनदाट त्या वृक्षाखाली,पांथस्थ विश्राम करे, दमुनी भागुनी थकुनी, आपले ठेवे ओझे खाली,–!!! माथ्यावर उन्हे तळपती, सावलीत आश्रय घेत असे, थंडगार पाणी पिऊनी, तहान तो भागवत असे,–!!! वाटसरू तो गरीब बिचारा, त्याच्या भुकेलाही धोंडे, पाणीच भूक भागवे, सोडवीत पोटाचे कोडे,–!!! गाठोडे आपले घेऊन डोई, पांथस्थ हात-पाय पसरे, डोळे मिटुनी जमिनीवरी, शांत निवांत होऊन पहुडे,–!!! निद्रादेवी रुंजी घाली, […]

निष्‍णात शल्‍यचिकित्‍सक डॉ. व्हिविअन थॉमस

डॉ. ब्‍लॅलॉक यांच्‍या जगप्रसिद्ध ‘ब्‍लॅलॉक-टॉऊसिग-थॉमस’ ही उपचारप्रणाली विकसित करण्‍यात ज्‍यांचे मोलाचे योगदान आहे ते व्हिविअन थॉमस! थॉमस, डॉ. ब्‍लॅलॉक यांचे शल्‍यचिकित्‍सेदरम्‍यान सहायक होते. चौतीस वर्ष डॉ. ब्‍लॅलॉक व थॉमस यांनी एकत्र काम केले. डॉ. ब्‍लॅलॉक यांच्‍या कित्‍येक संशोधनांचा पाया थॉमस यांनीच रचला होता. थॉमस कृष्‍णवर्णी-आफ्रिकन वंशाचे होते. त्‍यामुळे त्‍यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागत असे. ब्‍लॅलॉक यांच्‍याइतकेच […]

1 8 9 10 11 12 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..