लाटांचा न्यारा स्वभाव
लाटांचा न्यारा स्वभाव ,उंच उंच उचंबळती, खडी एक भिंत बनवत, सागरात उभ्या राहती, थेंबांची नक्षी हालती, पुढेमागे होती मोती,–!!! पुन्हा पुन्हा खेळत खेळत , मजेत धुंदीतनाचत– नाचत, एकमेकींवर आदळत आपटत, किती संख्येने उभ्या राहती,–!!! सागर मात्र शांत राही, लेकींचा आपल्या खेळ पाही त्याचीच मजा लुटत लुटत, कसा काय तटस्थ राही,–!!! शांतता धीरगंभीरता, आणतो तरी कुठून एवढी, […]