नवीन लेखन...

छंद 

प्रसिद्ध लेखक व पु काळे त्यांच्या वपुर्झा या पुस्तकात असं म्हणतात कि, माणसाला काही ना काही छंद हवा. स्वप्नं हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे ‘हरवणं-सापडणं’ प्रत्येकाचं निराळं असतं. […]

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – प्रस्तावना

सावरकरांनी भोगलेल्या जन्मठेपेत त्यांना जो मानसिक त्रास झाला त्यापेक्षा अधिक त्रास त्यांच्या आत्म्याला देश स्वतंत्र झाल्यावर झाला असेल. त्यामुळे सावरकर प्रेमींना सुद्धा यातना होत आहेत. निवडणुका येतात आणि जातात परंतु त्यानिमित्ताने सामान्य वकूब असलेले जेव्हा महापुरुषांवर चिखलफेक करतात त्यामुळे यातना होतात. काही सामान्य बुद्धिमत्तेच्या राजकारण्यांनी सावरकरांचा उल्लेख “माफीवीर” असा केला आणि समाजात मोठे वादळ उठले. […]

खांदेरी – उंदेरी जलदुर्गदर्शन मोहिम

अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात छत्रपती शिवाजी , संभाजी महाराज अन् त्यांचाच वारसा चालवत दर्यावर आपला दरारा निर्माण करणारे इंग्रज , डच, पोर्तुगीज, सिद्धीच्या उरात धडकि भरवणारे सरखेल कान्होजी आंग्रे. अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात ते अज्रस्त लाटांचे तडाखे सोसत वर्षानुवर्षे समुद्रात ताठ मानेने बुरुजावर झेंडा रोवून उभे असलेले कुलाबा, खांदेरी – उंदेरी , मुरुड- जंजिरा, कोरलई, रेवदंडा किल्ले. […]

बघता तुला प्रिया रे ,

बघता तुला प्रिया रे ,– जिवा बेचैनी येते, कासाविशी होता हृदयी, आत मोरपीस हलते,–!!! विलक्षण ओढ तुझी, काळजाला किती छळते, मूर्त माझ्या अंतरीची, अढळ अढळ होतं जाते,–!!! स्पर्श होता तुझा सख्या, माझी न मी असते, बाहूंत तुझ्या विसावण्या, किती काळ मी तरसते,–!!! तुझ्यातच सारे विश्व माझे, जगही तोकडे भासे, तुझ्याचसाठी राजसा, मन्मनीचा चकोर तरसे,–!!! उषा आणि […]

तेज:पुंज स्वातंत्र्यसूर्य

तेज:पुंज स्वातंत्र्यसूर्य,उगवला आपल्यामुळे, हरेक भारतीय मान तुकवी, आपुल्या या कर्तृत्त्वापुढे,—!!! असामान्य कार्याचा तुमच्या, गौरव किती करावा,-? प्रत्येकाने ओंजळभर वसा, हृदयी आपुल्या जपावा,–!!! हीच आपणांस श्रद्धांजली, शब्दकुसुमे विनम्र वहाते, तसे,भारतमातेच्या सुपुत्रास, शतश: नमन मी करते,—!!!!! विनायक नाम ते, आपण सार्थ केले, नायक बनुनी भारताला, स्वतंत्र तुम्ही केले,–!!!! हिमगौरी कर्वे.©

हे टिपूर चांदणे

हे टिपूर चांदणे, सख्या तुला बोलावे, आकाशातील घनमाला, घराची तुला वाट दाखवे, –||१|| डोईवरचा चंद्रमा, माझिया प्रियाला स्मरण देई, एक चंद्र घरी वाट पाहे, सारखा सूचित करत राही,–||2|| शांत नीरव वातावरणी, बघ सजणा बोल घुमती, विरहव्याकूळ तुझ्या प्रियेचे, कानात कसे गुपित सांगती,||3|| भवतीचा काळोखही, येण्याची तुझ्या वाट पाहे, मिलन कल्पून मनाशी, दोन जिवांची संगत देई, –||4|| […]

श्रीरामा, घन:श्यामा,sssss

श्रीरामा, घन:श्यामा,sssss— घनघोर या काननी, किती पुकारु तुमच्या नावा,ssss- लक्ष्मण भावजी गेले सोडुनी,–!!! ‌. अयोध्येस परतल्यावरी, बसले मी राणीपदी, आदर्श जोडप्याचा मान देऊनी जनतेने केले धन्य जीवनी,– त्यातच आणखी गोड बातमी, स्वर्गच दोन बोटे राहिला,–!!! कुणाची नजर लागली, ग्रहस्थिती विपरीत फिरली, तुम्ही का सोडले मज रानी, जावे कुठे एकाकी मी आता,–!!! मनोरथे सगळी संपली तुमची सेवा […]

लडाख मधील पेंगौंग लेक

पृथ्वीवरील स्वर्गच उतरलेला आहे की काय अशी वाटणारी जागा म्हणजे १४२७० फूट उंचीवरील ११० किमी लांब व ५ कीमी रुंद खार्या पाण्याचे सरोवर, लेह पासून १५५ किमी. ६ तासाचा प्रवास १७८०० फुटावरील बर्फात गाडलेल्या चांगला पास मधून होतो. […]

निसर्गावर अवलंबून

कितीही सारी धडपड करशी लाचार ठरतो अखेरी जाण माणसा मर्यादा तव आपल्या जीवनी परी … ।। क्षणाक्षणाला अवलंबूनी जीवन असे तुझे सारे पतंगा परि उडत राहते जसे सुटत असे वारे… ।। निसर्गाच्याच दये वरती जागत राहतो सदैव कृतघ्न असूनी मनाचा तूं विसरून जातो ती ठेव… ।। निसर्गाच्या मदती वाचूनी जगणे शक्य नसे तुजला जीवन कर्में करीत […]

भारताच्या ‘डेटा’ सुरक्षेकरता ५-जी नेटवर्कमध्ये चीनी कंपन्यांचा प्रवेश थांबवा

तैवानने नुकतेच सुरक्षेच्या मुद्द्यावरून चिनी कंपनी हुवावे आणि झेडटीईच्या नेटवर्क, मोबाईल व अन्य उत्पादनांवर बंदी घातली. अमेरिका, ब्रिटन, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने हुवावे व झेडटीईविरोधात याआधीच अशी पावले उचलली आहेत. १७० देशांत काम करणार्या हुवावेला हा एक मोठा झटका आहे. ट्रम्प प्रशासनाने ‘हुवावे’चा ‘एंट्री लिस्ट’ मध्ये समावेश केला आहे. ‘एंट्री लिस्ट’ ही अशा कंपन्यांची यादी आहे, ज्यांना सरकारी परवानगीशिवाय अमेरिकन कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही. […]

1 2 3 4 5 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..