विस्तीर्ण समुद्र किनारी
विस्तीर्ण समुद्र किनारी, फिरत फिरत निघाले, वाळूत चालताना ठसे, पावलांचे उमटलेले, –!!! दूर क्षितिजी सूर्यबिंब, घाईत होते चालले, रंगांची आरास पाहून, अचंबित की झाले,–!!! ढगांमागून निघाला, संधिप्रकाश आता, दिसू लागला धरणीवर, पखरुन घातलेला, –!!! याच ढगांवर स्वार होऊन, निघाला सोन्याचा गोळा, आभाळाला सप्तरंगी, आज साज चढवलेला,–!!! किती रंगांची रासक्रीडा, गगनी होती चाललेली, चकित होऊनी धरा, कशी […]