प्रेमाचा उगम
दाखवू नकोस प्रेम तुझे उपरेपणाच्या भावनेने । तसेच मिळेल परत तुला केवळ वाणीच्या शब्दाने ।। कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी । प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी ।। शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी । आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी ।। खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो । सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो ।। […]