टीव्ही बघणे…एक क्रिया
आपण टीव्ही वर जेव्हा कार्यक्रम पाहतो तेव्हा आणखी काय काय दिसते? प्रत्येक चॅनेल आपले नाव, तारीख व वेळ दाखविते. याव्यतिरिक्त बर्याच वेळा टीव्हीचा पडदा इतर कशा-कशाने व्यापलेला असतो. हे ‘इतर’ म्हणजे काय? तर कार्यक्रमांसंबंधी आणि प्रयोजक कंपन्यांच्या वस्तू व सेवेशी संबंधित जाहिराती, सूचना, निवेदने, आवाहने इत्यादी. हे सर्व चित्र, लिखित शब्द (Text) व ध्वनी या स्वरूपात असते. टीव्ही पहात असताना डोळे व कान काम करत असतात आणि हो, मेंदूही. […]