संध्यासमय येताच पक्षी
संध्यासमय येताच पक्षी, घरट्याकडे सारे निघाले, किती दूर, किती योजने, लांबवरी फार उडाले,–||१|| किलबिलाट करत पिल्ले, असतील वाट पाहत, सय येता त्यांची एकदम, पंखात जसे बळ शिरत,–||२|| आपुले घरटे नजरेस पडतां, जीव भांड्यात कसा पडे, पिल्ले सुरक्षित पाहता, आनंदओसंडे चहूकडे,–!!||३|| धोका किती कोवळ्या जिवांना, सोडून जायचे निराधार, नाग साप मांजरांचा , डोळाच असता त्यांच्यावर,-!!||४|| नित्य कामास […]