नवीन लेखन...

सरोवरात कमलिनी फुलतां

सरोवरात कमलिनी फुलतां, भ्रमर भोवती विहरू लागे, पाकळ्यांचे सौंदर्य पाहता, त्याचा मनमोर नाचू लागे,–! मोह पडे अगदी त्याला, टपोऱ्या मोहक कमळाचा, गुणगुणत मस्त मजेत, वाऱ्यावरती झोके घेत, उतावीळ एकदम तो, झटकन तेथे आला,–!!! ती आपल्याच नादात असे, ना तिच्या गावी त्याचे येणे, डुलता डुलता झुळकेबरोबरी,‌ तारुण्याचा तो आनंद उपभोगणे,–!!! मोहित भुंगा जवळी येता, गुंजारव सारखा करे,– […]

कर्तृत्वाचे कल्पतरू

जीवन गंगा वहात राही, फुलवित सारी जीवने, पडेल प्रवाहीं तिच्या कुणी,  लागते त्याला वाहणे….१, काही काळ वाहतो देह,  डूबून जाणे लक्ष्य तयाचे कसा वाहतो केंव्हां डुबतो,  वेग ठरवी हे प्रवाहाचे….२, बुडूनी जाती देह प्रवाही,  कर्मे आतील तरंगती वाहत वाहत नदी किनारी,  स्थीर होवून काठी राहती,….३, देह क्षणाचा जरी,  त्याची कर्मे चिरंतर राहती कर्तृत्वाच्या कल्पतरूनी, इतर जणांना […]

मुक्तछंद

आलास, ये वरूणराजा वाट पाहतो आहोत, अगदी चातकागत,— थोडा रेंगळ आमच्यासमवेत, भिजवून टाक धरणीला, तुझ्या संततधारेने, अरे तिला संजीवन दे रे,–!!! ती तडफडत्ये उन्हाने, रणरणतेपण खाते रे तिला, नखशिखांत भिजू देत तिला, तुझ्या जलप्रवाहांनी,— तरसता, पोळलेला तडफडतां, माणसाचाही आत्मा,— होईल संतुष्ट तिच्या भिजण्याने, धरती एकदा तृप्त होऊ दे, चराचर सृष्टी होऊ दे समाधानी, तू फक्त ये […]

वीज जाते आणि येते… मध्ये काय घडते?

आपल्या गावात आणि शहरातही अनेकदा वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार बर्‍याचदा होत असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसते. तसेच वीज जाते आणि येते, या मधल्या काळात काय घडते, हे जाणून घेण्याची गरज आहे. […]

निळ्या काळ्या यमुनेतीरी

निळ्या काळ्या यमुनेतीरी, कृष्ण राधेशी अनुनय करी, अंधारातून वरून बघती, चंद्र- चांदणी चमकू लागती,||१|| संधिकाली नीरवताही, निर्जनताही भोवताली, कान्हा वाजवी मुरली, राधा भान हरपली,–!!,||२|| बघतां बघतां तम लागे चढू, ओढ जिवांची की आत्म्यांची, दोघांसह येईना मुळी कळू, मागे टाकला संसार पती, टाकून सारे तिथेच ती, धावली कशी यमुनातीरी,–!!||३|| काय आहे कृष्ण म्हणजे, अशी ओढ कशी अनावर, […]

तप्त हृदयाला शांतवी

तप्त हृदयाला शांतवी, त्याला मित्र म्हणावे, रुक्ष मनाला पालवी, त्याला दोस्ती म्हणावे,–!!! वियोगाचे दुःख भोगी, त्यात समजावे त्याला, याच दुःखा हलके करुनी, प्रेम करे, तो सखा सोबती,–!!! संतापलेल्या मनींचे, ओरखाडे मिटवी तो, जो अशी साथ देई, त्याला मित्र म्हणावे,–!!! कडक उन्हात जो गारवा, आपणहून जिवां देई, हाताला धरून सावलीला, जो स्वतः आणून बसवी,–!!! थेंबभर अश्रू पाहुनी […]

असा कसा फसवशी कृष्णा

असा कसा फसवशी कृष्णा, जाऊन बसतोस कदंबावरी, पाण्यात आम्ही सचैल, घेऊन गेलास वसने वरी,–!!! थंडगार वार्‍याच्या झुळका, अंगागाला कशा झोंबती, पाण्यातून बाहेर येण्या, अशक्य वाटे आम्हा किती,–!!! काय हवे तुझं सांग तरी, आमुची वसने दे‌ झडकरी, कितीदा कराव्या विनंत्या, काकुळतीला आलो आम्ही,–!!! अर्ध्या पाण्यात उभे राहुनी, दमलो आम्ही साऱ्या सख्या, किती छळणार अजून सांग, नाही कुणीच […]

तुजकडे पाहुनी मज

तुजकडे पाहुनी मज, गूढ काही वाटते, ऊन सावली खेळ, मनात, काहीसे दाटते,–!!! तुझी चौकोनी नक्षी, नजर फिरवी चोहीकडे, आपल्यापल्याड काय चालते, लपवून ती दर्शवते,—!!! काही दरवाजे उघडे, का ठेवले कोणासाठी, कोण तेथे वावरे, कोण तिथे, संगती सोबती,–!!! किरण प्रकाशाचे येती, सावल्यांशी खेळत खेळत, अस्तित्व कोणाचे असे, कुणामुळे पसरत पसरत,–!!! सुख दुखांचे शब्द ऐकशी, जरी भले तू […]

फूल उमलताना

फूल उमलताना, त्याकडे बघत रहावे, सावकाश उघडतानां, पाकळी पाकळी हाले,–!!! सुरेख पहा रंगसंगती,– सुबक अगदी ठेवण, आकार प्रफुल्ल होताना, आनंदित आपले मन,–!!! वाऱ्यावर झुलताना, कळ कुठली कोण दाबे, अचानक फुलाची पाकळी, आतून उत्फुल्ल होऊ लागे–!!! हालचाल होताना तिची, नाजूक परागकण दिसती, उघडझाप त्यांची पाहता, आपले नेत्र सुखावती, फांदीवरची अनेक फुले, आतून कशी हालती, जाईचे निरीक्षण करावे, […]

मित्रवंदाचा दीप विझे

मित्रवंदाचा दीप विझे, सोनसंध्याकाळ झाली, संधिकालाचे आगमन होता, पाखरे घरां निघाली,–!!! आकाश काळवंडून गेले, चांदणी उगवू लागली, तम दाटता भोवती, धरती बेचैन झाली,–!!! प्रकाशाचे किरण संपले, अंधाराचा नाच खाली, आभाळातून चंद्रमा पाहे, वसुंधरा अंधारलेली,–!!! तिला पाहून बुडालेली,– चांदवा पसरे रजत-प्रकाश, ओहोटीच लागलेली,– समुद्रकिनारी कुठे गाज,–!!! रजनीच्या कुशीत झोपे, चराचर सृष्टी सावकाश, पृथा चिंतातुर होई,– तिला भास्कराची […]

1 4 5 6 7 8 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..