पुण्यातील संगीत महोत्सव
गणपती, दसरा- दिवाळी या सणासुदीच्या दिवसांनंतर पुण्यात संगीताचे वेगवेगळे महोत्सव एकानंतर एक चालु असतात. सवाईगंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, स्वरगंधार आणि शेवटी वसंतोत्सव. सवाईच्या सीझन तिकीटसाठी आतुन फिल्डिंग लावल्यास लाईनमधे उभे राहण व निराशा टाळता येउ शकते, स्वर गंधारमधे स्टुडंट डिस्काउंट असते तर वसंतोत्सव चक्क फ्रीच असतो. तिन्ही कार्यक्रमांसाठी खचाखच गर्दी होत असते. झुंडीने होणार्या ह्या गर्दीत दर्दी आणि “बेदर्दी” दोन्ही गटांचे सभासद आढळतात. […]