आत्मविश्वास
आत्मविश्वास जागृत ठेवूनी, कार्य घेवूनी तडीस नेती । कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती ।। ईश्वर करीतो मदत तयांना, मदत करी जे आपले आपण । आपल्यातची तो ईश्वर आहे, असते याची जयास जाण ।। विश्वासाने हुरूप येई, जागृत करीती अंतर चेतना । लक्ष्य सारे केंद्रीत होता, यश चमकते प्रयत्नांना ।। — डॉ. भगवान नागापूरकर […]